पोंडा/ पणजी (Goa Elections 2027) : आम आदमी पार्टीने (AAP) गोव्यातील पोंडा पोटनिवडणुकीत (Goa Elections 2027) आपली ताकद दाखवून दिली. 'AAP'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पोंडा येथे पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक यांच्या समर्थनार्थ एका 'परिवर्तन सभे'ला संबोधित केले. त्यांनी गोव्याच्या जनतेला थेट आवाहन केले: "2027 च्या विधानसभा निवडणुकीत 'AAP'ला एक संधी द्या, आणि आमचे सरकार स्थापन होताच, आम्ही एका महिन्यात संपूर्ण गोव्यात वीज मोफत करू."
केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले कीं, "दिल्ली आणि पंजाबमधील 'आप' सरकारने घरगुती वीज बिले शून्यावर आणली आहेत. गोव्यातही तेच होईल. संपूर्ण देशात फक्त दोन ठिकाणी मोफत वीज दिली जाते, दिल्ली आणि पंजाब, आणि तेही 'AAP'नेच केले आहे."
गोवा में 14 साल तक सत्ता में रहने के बाद भी BJP जनता को कीड़े वाला पानी पिला रही है.. pic.twitter.com/KPOVD5y8CK
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 1, 2026
केजरीवाल यांचा भाजपवर जोरदार निशाणा
- गोव्यात भाजप 14 वर्षांपासून सत्तेत आहे. पण लोकांना शिक्षण, आरोग्य, वीज किंवा स्वच्छ पाणी यांपैकी काहीही मिळालेले नाही.
- फक्त लूटमार झाली आहे. पोंडामध्ये सर्वत्र कचरा पसरलेला आहे, रस्ते तुटलेले आहेत आणि पथदिवे बंद आहेत.
- पिण्याच्या पाण्यात किड्यांचा प्रादुर्भाव आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर वर्षभरापासून बंद आहे.
- आयडी हॉस्पिटलमधील यंत्रे चालत नाहीत, औषधे उपलब्ध नाहीत आणि ते रुग्णांना सरळ जीएमसीकडे पाठवतात.
भाजप नगरसेवकाच्या मुलावर गंभीर आरोप
केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक संवेदनशील मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, एका भाजप नगरसेवकाच्या मुलावर 30 अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, पण संपूर्ण भाजप सरकार त्याला वाचवण्यात व्यस्त आहे. प्रदेशाध्यक्ष मुलाच्या वडिलांबद्दल सहानुभूती व्यक्त करत आहेत, पण पीडित मुलांच्या कुटुंबीयांबद्दल कोणतीही सहानुभूती नाही.
Today, at the Parivartan Sabha in Ponda, Goa, I addressed a public gathering in strong support of our candidate, Geetesh Naik.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 1, 2026
Goans deserve a party that works with honesty and leaders who truly understand the pain of the people. The people of Goa are looking towards Aam Aadmi… pic.twitter.com/BmCXZiYL9X
केजरीवालांचे अंतिम आवाहन
"पोंडाच्या जनतेने यापूर्वी एमजीपी, काँग्रेस आणि भाजपला संधी दिली होती. आता फक्त 8 महिने उरले आहेत. या वेळी AAP ला एक संधी द्या. जर आम्ही काम करून दाखवले नाही, तर पुढच्या निवडणुकीत (Goa Elections 2027) आमची जागा घ्या. पण किमान एक प्रयत्न तरी करून बघा." पोंडा पोटनिवडणूक 9 एप्रिल रोजी आहे. केजरीवालांनी स्पष्टपणे सांगितले. या वेळी 'AAP 'ला जिंकवून द्या, 2027 मध्ये गोव्याची सत्ता सोपवा आणि वीज मोफत करा.