महाले परिवाराच्या गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट
चिखली (Mahale Family Ganaraya) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याच्या पशुसंवर्धन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पंकजाताई मुंडे यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. महाले परिवाराच्या वतीने मान्यवरांचे आपुलकीने स्वागत करण्यात आले. यावेळी श्वेताताई महाले पाटील, विद्याधर महाले यांच्यासह महाले परिवारातील सदस्यांशी मुख्यमंत्री फडणवीस व पंकजाताई मुंडे यांनी संवाद साधला.

गणेशोत्सवाच्या (Mahale Family Ganaraya) पावन पर्वावर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे महाले परिवाराच्या निवासस्थानी आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी श्री गणरायाची कृपादृष्टी सदैव राहावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.