रोहित पवार

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची हिंगोलीत महत्त्वपूर्ण बैठक 

Rohit Pawar: छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते व आमदार रोहित पवार हिंगोली दौऱ्यावर येत आहेत.

शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांची हिंगोलीत महत्त्वपूर्ण बैठक 

Rohit Pawar


शुक्रवारी कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

हिंगोली (Rohit Pawar) : छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते व आमदार रोहित पवार हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. येत्या शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कोथळज रोडवरील राष्ट्रवादी भवन येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माजी उपाध्यक्ष मनीष आखरे यांनी या बैठकीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या भव्य शेतकरी मोर्चाच्या नियोजनाच्या अनुषंगाने ही बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून त्याची तयारी हिंगोली जिल्ह्यातून सुरू झाली आहे.

या बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, विद्यार्थी आघाडी तसेच पक्षाच्या सर्व विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार हे स्वतः कार्यकर्त्यांशी संवाद साधून मोर्चाच्या पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणारे युवा नेतृत्व म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या हिंगोली दौऱ्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शुक्रवारच्या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
पावसाचा जोर वाढला, पण शेतकरी हटले नाहीत; प्रकाश पोहरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी

पावसाचा जोर वाढला, पण शेतकरी हटले नाहीत; प्रकाश पोहरे यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी

नागभीड तहसील कार्यालयाजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. तरीही शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. हजारो शेतकरी पावसातही ठामपणे उपस्थित राहिले.

Sep 17, 2026
नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

नागभीडमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा; ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दराची मागणी

धान बोनस, ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर आणि २४ तास वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात नागभीडमध्ये हजारो शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा.

Sep 17, 2026
शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

शक्तीपीठ महामार्गाला विरोध; संतप्त शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांना विचारला जाब

Shaktipeeth Expressway: जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गा करीता अनेक शेतकर्‍यांची शेती जाणार आहे. या शक्तीपीठ महामार्गाला संघर्ष समितीकडून विरोध होत आहे.

Aug 16, 2026
शेतकऱ्याचे अनुदान अपहार करणारे अधिकाऱ्यावर कारवाईचे मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

शेतकऱ्याचे अनुदान अपहार करणारे अधिकाऱ्यावर कारवाईचे मागणीसाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Farmers Thiya Andolan: कळमनुरी तालुक्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानातील अनुदान अपहार करण्याच्या आरोपावर कारवाईकरिता कडक मागणी करून आंदोलन केले.

Aug 10, 2026