रविकांत तुपकरांचा सवाल

दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू; रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल

Ravikant Tupkar: राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश न झाल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाण्याला डच्चू; रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना थेट सवाल

Ravikant Tupkar

 

'बुलढाण्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी १ लाखांची मदत देण्याची मागणी;
'बांधावर या, पिकांची अवस्था पाहा'; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

चिखली (Ravikant Tupkar) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश १८ जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश न झाल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने मोठी दडी मारल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांची अवस्था गंभीर झाली असून, सोयाबीनसह विविध पिके करपली आहेत. अशा परिस्थितीत बुलढाण्याला दुष्काळसदृश यादीतून वगळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया तुपकर (Ravikant Tupkar) यांनी व्यक्त केली.

दुष्काळाची परिस्थिती मंत्रालयातील एसी केबिनमध्ये बसून कागदोपत्री ठरविण्याऐवजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहावी, अशी मागणी करत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सरकार आणि प्रशासनाला धारेवर धरले. “अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असती तर केवळ १८ नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्हे दुष्काळसदृश यादीत आले असते. शेतकऱ्यांना कमीत कमी मदत द्यावी लागावी म्हणूनच ही यादी तयार करण्यात आली आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पावसाच्या खंडाने पिकांची होरपळबुलढाणा जिल्ह्यात दीड महिन्याच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडला. कडक उन्हामुळे सोयाबीनसह खरीप पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे.

विशेषतः फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाऊस न झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस  असला तरी पिकांना आवश्यक असलेल्या कालावधीत पाऊस न मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे.दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी एक लाखांची मदत द्याबुलढाणा जिल्ह्यातील परिस्थितीची तातडीने दखल घेऊन जिल्ह्याचा दुष्काळसदृश यादीत समावेश करावा, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी तुपकर यांनी केली.“शेतकऱ्याने पिकासाठी पैसा खर्च केला, मेहनत घेतली, रात्रंदिवस कष्ट केले.

मात्र पाऊस नाही म्हणून पीक हातातून गेले. आता सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचे का? बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीत घ्या आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या,” असे तुपकर यांनी म्हटले.सत्ताधारी लोकप्रतिनिधींना खडे बोलबुलढाणा जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे एक खासदार आणि सहा आमदार आहेत. या सर्व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे सांगत तुपकर यांनी त्यांना थेट लक्ष्य केले. आणि मतदारसंघात  एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मंत्रालयात जाऊन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी भांडा. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आहे,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सुनावले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा दाखलाअलीकडेच झालेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा दाखला देत तुपकर यांनी सर्वपक्षीय नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येण्याचे आवाहन केले. “जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक आली तेव्हा सर्व पक्षांचे नेते राजकीय जोडे बाजूला ठेवून एका पॅनलमध्ये एकत्र आले. मग शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र येण्यात अडचण काय?” असा सवाल त्यांनी केला.“शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवावेत आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन बसावे. जोपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळाच्या यादीत बसत नाही, तोपर्यंत तिथून उठू नये,” असेही (Ravikant Tupkar) तुपकर यांनी म्हटले.

पश्चिम महाराष्ट्राचा आदर्श घ्यापश्चिम महाराष्ट्रात महापुराच्या काळात सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र आले होते. आपापले राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे नुकसानभरपाईची मागणी लावून धरली आणि मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिली. त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन तुपकर यांनी केले.“इथे आपसात भांडून काय मिळणार आहे? शेतकरी संकटात आहे. त्याच्यासाठी एकत्र या,” असे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून निर्णय मंजूर करून घ्या!दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी तयार करताना केवळ कागदोपत्री आकडेवारी आणि अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतातील परिस्थितीची पाहणी करावी, अशी मागणी तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली.

“एसी केबिनमध्ये बसून दुष्काळ ठरवू नका. शेतकऱ्यांच्या बांधावर या, करपलेली पिकं पाहा, शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहा आणि मग निर्णय घ्या. बुलढाण्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनात बसून बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीत बसवल्याशिवाय बाहेर पडू नये,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराबुलढाणा जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने दुष्काळसदृश यादीत जिल्ह्याचा समावेश करावा, कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी (Ravikant Tupkar) तुपकर यांनी केली आहे.

“बुलढाण्याला दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी एकत्र यावे. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. सत्ताधाऱ्यांना आमच्या स्टाईलने जाब विचारू आणि सळो की पळो करून सोडू,” असा आक्रमक इशारा (Ravikant Tupkar) रविकांत तुपकर यांनी दिला.

टैग्स: Ravikant Tupkar

संबंधित सामग्री

शेतकरी कर्जमाफीला पुन्हा विलंब! इन्कम टॅक्स डेटाची प्रतीक्षा; आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही मोठा निर्णय शक्य

शेतकरी कर्जमाफीला पुन्हा विलंब! इन्कम टॅक्स डेटाची प्रतीक्षा; आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही मोठा निर्णय शक्य

महायुती सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'च्या अंमलबजावणीत पुन्हा एकदा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Jul 10, 2026
शेतकऱ्यांनो एकत्र या;तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – विनायक सरनाईक

शेतकऱ्यांनो एकत्र या;तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – विनायक सरनाईक

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्यापासून आरपारची लढाई छेडण्याचा एल्गार पुकारला आहे.

Jun 15, 2026
जिल्ह्यात डीएपी खतांचा तुटवडा; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला घेराव

जिल्ह्यात डीएपी खतांचा तुटवडा; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा कृषी विभागाला घेराव

खरीप हंगामाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यात डीएपीसह इतर रासायनिक खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Jun 12, 2026