नाशिक (Nashik Swine Flu) : जुलै महिन्यातील मुसळधार पावसानंतर शहरात डेंग्यू आणि साथीच्या आजारांबरोबरच स्वाईन फ्लूचे संकटही उभे ठाकले आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ६९ वर्षीय वृद्धा, पिंपळणारे येथील ५५ वर्षीय पुरुष आणि नाशिक शहरातील आडगाव परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
जानेवारीपासून आतापर्यंत तापसदृश आजार असलेल्या ६८,१२२ नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले. त्यापैकी २२९ जणांना (Nashik Swine Flu) स्वाइन फ्लूसदृश लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातून ४३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या १२ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून, २८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे केवळ सात रुग्ण होते. मात्र, जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. जुलैमध्ये २१, तर ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत १५ नवे रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहरातील ३० आणि ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे.
“स्वाइन फ्लूची स्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरू नये. लक्षणे दिसताच त्वरित रुग्णालयात उपचार घ्यावेत,” असे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रशांत शेटे यांनी सांगितले.
वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणेजवळ सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार मंगेश पांडू कराटे यांचा जागीच मृत्यू झाला. विजय शेखरे व रेखाबाई विजय शेखरे गंभीर जखमी झाले असून, रेखाबाई यांची प्रकृती चिंताजनक आहे. कारचालकासह कारमधील एक जणही जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलिस तपरत करीत आहेत.
नाशिक स्वाइन फ्लू
नाशिक शहरात वाढला स्वाइन फ्लूचा धोका; तिघांचा करुण अंत, 43 रुग्ण पॉझिटिव्ह
Nashik Swine Flu: मुसळधार पावसानंतर शहरात डेंग्यू आणि साथीच्या आजारांबरोबरच स्वाईन फ्लूचे संकटही उभे ठाकले आहे. शहरासह लगतच्या ग्रामीण भागात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असून, आतापर्यंत ४३ रुग्ण
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Nashik Swine Flu