सायबर रॅकेट पर्दाफाश

500 कोटींच्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातून 12 आरोपींना केली अटक

Cyber ​​Racket Busted: दुबईतून चालणार्‍या सायबर रॅकेटचा मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-२च्या पोलिसांनी अखेर पर्दाफाश करीत गोव्यातून 12 आरोपींना अटक केली आहे.

500 कोटींच्या सायबर रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातून 12 आरोपींना केली अटक

Cyber ​​Racket Busted

वर्धा (Cyber ​​Racket Busted) : दुबईतून चालणार्‍या सायबर रॅकेटचा मुंबईच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-२च्या पोलिसांनी अखेर पर्दाफाश करीत गोव्यातून 12 आरोपींना अटक केली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी गोव्यातील कळंगुट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कासा डी निकोल व्हिला येथे छापा टाकून ही कारवाई केली. आता यातील मुख्य आरोपींच्या मुस्क्या आवळण्याकरीता पोलिस नियोजन करीत आहे.

यातील काही आरोपींना 35 हजार रुपये दरमहा वेतनावर ठेवले होते. पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी या कारवाईची माहिती दिली. पोलिसांनी या कारवाईत 15 लॅपटॉप, 85 मोबाईल, 125 एटीएम कार्ड, 76 सिमकार्ड, 22 चेकबूक तसेच 77 पासबूक जप्त केले आहेत. या (Cyber ​​Racket Busted) रॅकेटचा सूत्रधार दुबईत बसून सूत्रे हलवायचा, त्याचा शोध घेतला जात आहे. 150 बँक खाती तपासाच्या कक्षेत आहेत.राष्ट्रीय हेल्पलाईन 1930 वर आलेल्या 83 तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत पोलिसांनी अटक केलेले आरोपी मुंबई तसेच गुजरात राज्यातील रहिवासी आहेत.पायधुणी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सायबर फसवणूक गुन्ह्याच्या तपासातून या रॅकेटचा उलगडा झाला. यापूर्वी (Cyber ​​Racket Busted) अटक केलेल्या आरोपींची चौकशी तसेच डिजिटल पुराव्याच्या विश्लेषणातून गोव्यातून आर्थिक फसवणुकीचा व्यवहार सुरु असल्याचे समोर आले, पण पुढे याचा मुख्य सूत्रधार दुबईत असल्याचेही स्पष्ट झाले. मागील 6 महिन्यात या टोळीने 500 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

संबंधित सामग्री

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026