आमदार तान्हाजीराव मुटकुळे

आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या संकल्पनेतून हिंगोलीत ‘जनसेवा मदत कक्ष’ सुरू

MLA Tanhajirao Mutkule:

आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांच्या संकल्पनेतून हिंगोलीत ‘जनसेवा मदत कक्ष’ सुरू

MLA Tanhajirao Mutkule

हिंगोली (MLA Tanhajirao Mutkule) : नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, मदत आणि तक्रार निवारणासाठी थेट संपर्क साधता यावा यासाठी  आमदार  तान्हाजीराव मुटकुळे (MLA Tanhajirao Mutkule) यांच्या संकल्पनेतून ‘जनसेवा मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हिंगोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोणत्याही शासकीय मदतीसाठी, शासकीय योजनांच्या माहितीसाठी तसेच तक्रार निवारणासाठी आता थेट या मदत कक्षाशी संपर्क साधता येणार आहे. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कक्ष महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. 

या मदत कक्षामार्फत शासकीय योजना माहिती, शासकीय मदत मार्गदर्शन, तक्रार निवारण सहाय्य आणि अर्ज प्रक्रिया मार्गदर्शन या चार मुख्य सेवा पुरवल्या जाणार आहेत. नागरिकांनी 8090069090 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार तान्हाजीराव मुटकुळे (MLA Tanhajirao Mutkule) यांच्या या उपक्रमामुळे शासन आणि जनता यांच्यातील दरी कमी होऊन पारदर्शक कारभाराला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हिंगोलीतील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप हिंगोली विधानसभेच्या वतीने करण्यात आले आहे.

टैग्स: MLA Tanhajirao Mutkule

संबंधित सामग्री

आ. तान्हाजीराव मुटकुळे यांच्या दीर्घायुष्यासाठी जलेश्वर मंदिरात महापूजा 

आ. तान्हाजीराव मुटकुळे यांच्या दीर्घायुष्यासाठी जलेश्वर मंदिरात महापूजा 

MLA Tanhajirao Mutkule: हिंगोली जिल्ह्यातील तान्हाजीराव मुटकुळे यांचा शांतिपूर्वक समाधान करताना, दिव्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी मंदिरात महापूजेच्या आयोजनात भक्तीमय वातावरण आलेच.

Aug 18, 2026