हिंगोली भिषण फटाका स्फोट

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion

 

घरामध्ये साठवणूक केलेल्या फटाक्याला आग लागल्याने अनेक जण भाजले

हिंगोली (Hingoli firecracker explosion) : शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दोघांची ओळख पटली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,  हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांचे निवास स्थान आहे. त्यांच्याच निवासस्थाना  मध्ये त्यांनी दिपावली निमित्त फटाक्याचा साठा उपलब्ध करून ठेवला होता.५ ऑक्टोंबर रोजी रात्री ७.४० च्या सुमारास अचानक आग लागली. हळुहळु ही आग वाढतच असताना फटाके ठेवलेल्या ठिकाणीही  ही आग पोहचली. यावेळी फटाक्यांची अतिषबाजी सुरू झाल्याने जवळपास असलेल्या घरामधील नागरिकांतुन एकच आरडाओरड सुरू झाली. याबाबतची माहिती हिंगोली नगर पालिकेच्या अग्निशामक दलाला दिल्याने तात्काळ अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी पोहचले.

या (Hingoli firecracker explosion) भागात एकच पळापळ सुरू झाल्याने काहीसा गोंधळ उडाला होता. याची माहिती आ. संतोष बांगर यांना मिळताच त्यांच्यासह शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक कपिल खंडेलवाल यांनी देखिल तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. आ.बांगर यांनी जिवाची पर्वा न करता स्वताः आग विझविण्याकरीता मोलाचे प्रयत्न केले. या आगीमध्ये बासटवार यांच्या निवासस्थानालगत असलेले रमेश चौधरी, भरत चौधरी, शैलेश नांदेडकर यांच्यासह काही जण भाजले. त्यांना तात्काळ उपचाराकरीता हिंगोलीतील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. अखिल अग्रवाल यांच्यासह डॉक्टरांनी औषधोपोचार केले.

दरम्यान आग विझविण्याकरीता गेलेले नगर पालिकेचे लहान अग्निशामन बंबाला ही आग लागली. यासोबतच बासटवार यांच्या घराजवळील स्क्रुटीने ही पेट घेतला. आगीचे रौद्ररुप लक्षात घेता अग्निशामक दलाच्या मोठ्या बंबालाही पाचारण करण्यात आले. या भागातील रस्ते लहान असल्याने अग्निशामक दलाचे बंब घटना स्थळी पोहचण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागली. ही आग अधिकच वाढली होती. आग विझवितांना भरत चौधरी, कपिल खंडेलवाल, रमेश चौधरी, आमीश चौधरी, अग्निशामक दलावरील दोन कर्मचारी यांच्यासह सात जण जखमी झाले.

यासोबतच आणखी काही जण आगीत भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच डॉ. राम मुंढे यांच्या शुभम हॉस्पिटलमध्ये ही उपचार सुरू असल्याचे सुत्राकडुन समजले. ही आग विझविण्याकरीता मोठे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी पोलीसांची यंत्रणाही दाखल झाली होती. दरम्यान या (Hingoli firecracker explosion) आगेमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दोघांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांची ओळख अद्याप पर्यंत पटली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026