Maharashtra Rain Alert

महाराष्ट्र राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात ऑरेंज, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भात ऑरेंज, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जुलैअखेरपर्यंत विशेषतः विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागात पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

विदर्भात ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ जुलै रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज

२८ ते ३१ जुलै या कालावधीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन पर्यटक आणि स्थानिकांनी घाटमार्गावरील प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.

२८ जुलै २०२६

यलो अलर्ट: रायगड, जळगाव, पुणे घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

२९ जुलै २०२६

ऑरेंज अलर्ट: गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.

यलो अलर्ट: नाशिक, नाशिक घाट, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग.

३० जुलै २०२६

ऑरेंज अलर्ट: चंद्रपूर.

यलो अलर्ट: रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.

३१ जुलै २०२६

यलो अलर्ट: रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, वर्धा आणि यवतमाळ.

संबंधित सामग्री

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

धान खरेदी तातडीने सुरू करा व कोरेगाव–चोप रस्त्याची दुरुस्ती मागणी

Gadchiroli Paddy Procurement: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान खरेदीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवून धान खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात यावी, तसेच. धान खरेदी करणाऱ्या संस्था

Oct 02, 2026
संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

संच मान्यतेतील त्रुटी दूर करून अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया स्थगित करा

Vidarbha Junior College Teachers' Association: सत्र २०२५-२६ च्या संच मान्यतेमध्ये असलेल्या त्रुटी दुरुस्त करून, त्याआधारे सुरू करण्यात आलेली अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया तातडीने स्थगित करा...

Oct 01, 2026
जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

जनशताब्दी एक्स्प्रेसचा खोळंबा! इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, पेण स्थानकात तीन तासांपासून गाडी उभी

पेण स्थानकात जनशताब्दी एक्स्प्रेस तीन तासांपासून थांबली आहे. इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

Sep 29, 2026