माजी मंत्री आमदार अमित देशमुख

'खरं म्हणजे, महेश देशमुख यांचं कौतुक करावं वाटतं; निवडणुकीत त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली!'

MLA Amit Deshmukh: खरं म्हणजे, महेश देशमुख यांचं कौतुक करावं वाटतं! या निवडणुकीत त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली!' असे म्हणत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांकडून

'खरं म्हणजे, महेश देशमुख यांचं कौतुक करावं वाटतं; निवडणुकीत त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली!'

MLA Amit Deshmukh

 

सत्ताधाऱ्यांच्या दबाव तंत्रावर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा प्रहार!

लातूर (MLA Amit Deshmukh) : 'खरं म्हणजे, महेश देशमुख यांचं कौतुक करावं वाटतं! या निवडणुकीत त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली!' असे म्हणत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार अमित देशमुख (MLA Amit Deshmukh) यांनी सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर वापरल्या गेलेल्या दबाव तंत्रांवर प्रहार केला. निवडणुकाच होऊ नये, यासाठी सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीत अनेक प्रकारे दबाव तंत्र वापरले, मात्र लोकशाही टिकण्यासाठी ही निवडणूक आवश्यक आहे, असेही आमदार देशमुख म्हणाले. 

लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महेश देशमुख यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून ते या निवडणुकीत मैदानात आहेत. महेश देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत इतिहास निर्माण केला असून राज्यात काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून येणारे ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, अशी ओळख माजी मंत्री आमदार अमित देशमुख (MLA Amit Deshmukh) यांनी लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करून दिली.

या पत्रकार परिषदेला उमेदवार महेश देशमुख, खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्यासह लातूर, धाराशिव, बीडचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहर जिल्हाध्यक्ष, महापालिका व जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत गटनेते, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.  महेश देशमुख हे तरुण आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात जे मतदार आहेत, त्यांच्याच वयोगटाचे ते उमेदवार आहेत. त्यामुळे आपला उमेदवार ही भावना सर्व सदस्यांमध्ये सहाजिकच आहे. काँग्रेसने महेश देशमुख यांच्या रूपाने योग्य उमेदवार दिला आहे, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे.

लातूर, धाराशिव व बीड या तिन्ही जिल्ह्यातील प्रश्नाला ते निश्चित वाचा फोडतील. प्रचाराला पंधरा दिवस आहेत. मतदाराच्या त्यांनी भेटी घेत आहेत. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात ते सर्व मतदारांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास माजी मंत्री आमदारांनी देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी उमेदवार महेश देशमुख, खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे, बीडचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, लातूरचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांनी आपली भूमिका मांडली.

महेश देशमुख इतिहास रचतील!

लातूर-धाराशिव-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महेश देशमुख यांचा परिचय व्हावा, त्यांची भूमिका जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी आज ही पत्रकार परिषद होत आहे. सामान्यांचा उमेदवार म्हणून ते ही निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून महेश देशमुख यांना इतिहास रचण्याची संधी आहे आणि ते निश्चितच या निवडणुकीत इतिहास रचतील, असा विश्वास माजी मंत्री काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख (MLA Amit Deshmukh) यांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026