राष्ट्रीय पेन्शन योजना

राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतीच्या कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू

National Pension System: २० वर्षांपूर्वी या लाभासाठी वंचित ठेवलेल्या नगर परिषद, नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रिय पेन्शन योजना लागू करण्यात आली. अभिषेक कृष्णा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतीच्या कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू

National Pension System

 

आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांच्या प्रयत्नांना यश

हिंगोली (National Pension System) : राज्यातील इतर शासकीय निमशासकीय कर्मचार्‍यांना शासनाने २००५ च्या नंतर सेवेत आलेल्या कर्मचार्‍यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु केली होती. परंतु मागील २० वर्षापासून नगर परिषद, नगर पंचायतीच्या कर्मचार्‍यांना या पेन्शन योजनेपासून वंचीत ठेवले होते. या २० वर्षाच्या कालावधीत बरेच सफाई कामगार व इतर विभागातील कर्मचारी मयत सुध्दा झाले होते. त्यांच्या कुटूबींयांना सेवानिवृत्ती योजना लागु नसल्याने पेन्शन रजा रोखीकरण इत्यादी लाभ मिळत नव्हते. संघटने मार्फत राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतीच्या कर्मचार्‍यांना नवी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी मागली २० वर्षापासून लावुन धरली होती. संघटनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी नगर विकास विभाग, नगर विकास मंत्री वित्त विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची सुध्दा भेट संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतली होती. 

अध्यक्ष तथा संचालक अभिषेक कृष्णा ह्यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांची २४ जून रोजी बैठक घेऊन सदरील पेन्शन योजना लागू करण्या बाबत व्यक्तीश: शासन स्तरावर पाठपुरावा करण्या बाबत बैठकीत आश्वासन दिले होते. त्यानुसार नगर विकास खात्याने शासन निर्णय ९ जुलै २०२६ रोजी शासन परीपत्रक काढून राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतीच्या कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू केलेली आहे. संघटनेच्या वतीने अध्यक्ष तथा संचालक अभिषेक कृष्णा यांचे आभार व्यक्त केले आहेत. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू झाल्याने नगर परिषद, नगर पंचायतीच्या कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र राज्य महानगर पालिका, नगर पालिका कर्मचारी संघटनेचा वेळोवेळी पाठपुरावा
 राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका व नगर पंचायत कर्मचार्‍यांच्या अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महानगर पालिका/ नगर पालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने शासन स्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. या संदर्भात अनेक मंत्र्यांसह सचिवांसोबत बैठकाही घेण्यात आल्या. अशा बैठकांचे फलीत अनेक वेळा मिळाले. राष्ट्रीय नियुक्ती वेतन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर अप्पर मुख्यसचिव गोविंदराज व आयुक्त तथा संचालक अभिषेक कृष्णा यांच्या प्रयत्नातून ही योजना लागू झाली असुन या संदर्भात शासनाने आदेशही काढला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य महानगर पालिका, नगर पालिका कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ घुगे यांनी दिली आहे.