लातूर शिवसेना

शिवसेनेने केले ठाकरे सरकारचे स्वप्न साकार!

Latur Shiv Sena:

शिवसेनेने केले ठाकरे सरकारचे स्वप्न साकार!

Latur Shiv Sena

 

लातूरमध्ये आता सहज मिळणार गोरगरिबांना बांधकाम परवाना: बालाजी जाधव 

लातूर (Latur Shiv Sena) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरगरिबांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लातूरमध्ये आम्ही दिलेल्या लढ्याला यश आले, आता लातूरमध्ये गोरगरिबांना बांधकाम परवाना अगदी सहजासहजी मिळेल, याचे समाधान शिवसेनेला आहे, अशी भूमिका शिवसेना उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव यांनी मांडली. लातूर शहरातील पाच प्रमुख प्रश्नांसाठी शिवसेनेने केलेल्या आंदोलनाला यश आल्याच्या पार्श्वभूमीवर दैनिक 'देशोन्नती'शी ते बोलत होते. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Latur Shiv Sena) यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना 2020 मध्ये युडीसीपीआर अर्थात् एकत्रित विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू केली. राज्यात मुंबई आणि बृहन्मुंबई वगळता सर्वत्र शहरांना ही एकसमान नियमावली लागू करण्यात आली. याचा उद्देश एवढाच होता की, शहरांमध्ये गुंठा अर्धा गुंठा किंवा कमीत कमी क्षेत्र खरेदी करून  त्यातून आपले घरकुल बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला कुटुंबाला दिलासा द्यावा. सरकारने निर्णय घेतला आणि राज्यात सर्वच महानगरपालिकांमध्ये तो लागू झाला. मात्र लातूर महानगरपालिकेत या अंतर्गत लो रिस्क व मॉडरेट रिस्क बांधकाम परवाने देण्याचे काम झाले नसल्याने लातूर शहरातील सर्वसामान्य कुटुंबे अत्यंत अडचणीत असल्याचे सातत्याने दिसून येत होते.

अखेर या प्रश्नात महापालिकेने लेखी आश्वासन दिल्याने हे सर्व प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे, असेही बालाजी जाधव यावेळी म्हणाले. लातूर शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. खरे पाहिले तर शहरांमध्ये सध्या वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार गल्लीबोळासह प्रमुख रस्त्यावरही होत आहेत. या एकाच प्रश्नामुळे लातूर शहरात पोलीस प्रशासनासह सर्वसामान्य लातूरकरांचा श्वास गुदमरून गेला आहे. यातूनच सुटका करून घ्यायची असेल तर आम्ही शहरात असलेल्या रिंग रोड लगतच्या सर्विस रोडवरील अतिक्रमणे हटविण्याचा विषय प्रामुख्याने पुढे मांडला व त्यात यश आले, असेही जाधव म्हणाले.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख चव्हाण, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, जिल्हा समन्वयक पप्पू भाई कुलकर्णी, जिल्हा संघटिका शोभाताई बेंजर्गे, महिला संघटिका जयश्रीताई उटगे, जिल्हा सहसंपर्कप्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, महानगरप्रमुख विष्णुपंत साठे, शहर प्रमुख माधव कलमुकले व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी हा लढा यशस्वी करण्याचा निर्धार केला होता, आणि त्यात आम्हाला यश आले. लातूर मधील गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबांना न्याय देण्यासाठी आम्ही केलेल्या आंदोलनात यश आल्याचा आनंद आम्हाला निश्चित आहे.

शिवसेनेने पुरविले सबळ पुरावे...
शहराच्या अवतीभोवती जवळपास 22 किलोमीटर लांबीचा रिंग रोड आहे. या रिंग रोड लगत जर 12 मीटर रुंदीचे दोन्ही बाजूंनी सर्विस रोड अतिक्रमण मुक्त झाले तर लातूर शहराच्या या रिंग रोडसह वाहनांसाठी 180 फूट रुंदीचे रस्ते मिळाले तर लातूर शहरातील वाहतूक कोंडीवर हा जालीम उपाय ठरणार आहे, हे जाणून आम्ही या प्रश्नात लक्ष घातले. केवळ लक्षच घातले नाही तर प्रशासनाला याबाबतचे सबळ पुरावे शिवसेनेच्या वतीने आम्ही पुरविले. आणि या प्रशासनाने आमचे म्हणणे मान्य करून ही अतिक्रमणे हटविण्याचे लेखी आश्वासन दिल्याने लातूर शहराच्या रिंग रोड लगत रस्ते खुले झाल्यास शहराचा श्वास मोकळा होणार आहे.

लढ्याला मिळाले नेत्यांचे पाठबळ
गेली दोन वर्षे आपण यासाठी सातत्याने पाठपुरावा करून महापालिकेने याबाबतचे परवाने देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली. मात्र महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याची खंत वारंवार मनाला बोचत होती. म्हणून आपण अखेर याप्रकरणी लातूरचे आमदार, माजी मंत्री अमितभैया देशमुख यांची भेट घेऊन त्यांना हा विषय सांगितला. त्यांनी याबाबत आपणाला पाठबळ दिल्याने आपण हा लढा निकराने लढण्यासाठी पाऊल टाकले आणि यासाठी शिवसेनेचे नेते विधान परिषद सदस्य अंबादास दानवे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पाठबळ दिले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी घेतलेल्या निर्णयाची लातूरमध्ये अंमलबजावणी करण्यास महापालिकेला भाग पाडण्याचे बळ (Latur Shiv Sena) लातूरच्या शिवसैनिकांना मिळाले.

संबंधित सामग्री

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

आगीतील जखमी कर्मचार्‍यांना प्रत्येकी १ लाखाची मदत: नगराध्यक्षा रेखाताई बांगर

Municipal President Rekhatai Bangar: शहरांमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग लागून घडलेल्या घटनेत आगीत होरपळलेल्या जखमी नगरपालिका कर्मचार्‍यास प्रत्येकी एक लाखाची मदत नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम  बांगर

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026