करवंड महोत्सव 2026

करवंड महोत्सव २०२६ निमित्त पाहणी; वारशाला  मिळणार नवा उजाळा..

MLA Sanjay Gaikwad: २०२६ मध्ये होणाऱ्या करवंड महोत्सवासाठी आ. संजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, याचे उद्दिष्ट इतिहास जपणे आणि पर्यटन वाढवणे आहे.

करवंड महोत्सव २०२६ निमित्त पाहणी; वारशाला  मिळणार नवा उजाळा..

MLA Sanjay Gaikwad

करवंडला व्हावे ऐतिहासिक पर्यटनाचे केंद्र: आ.संजय गायकवाड

धोत्रा भनगोजी/चिखली (MLA Sanjay Gaikwad) : छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणून ओळख असलेल्या करवंड (बावन्नबुर्जी) येथे आयोजित ‘करवंड महोत्सव २०२६’ च्या तयारीची आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी आज रविवार २२ मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. या ऐतिहासिक ठिकाणाशी जोडलेल्या गौरवशाली परंपरेमुळे हा महोत्सव विशेष महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगून करवंड हे ऐतिहासिक पर्यटनाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

चिखली तालुक्यातील करवंड (Karwand Festival 2026) येथील ऐतिहासिक बुरुजाना आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी करवंड मोहोत्सव समितीच्या सदस्यांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राणी गुणवंताबाई इंगळे यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह १५ एप्रिल १६५७ रोजी याच ठिकाणी पार पडल्याची ऐतिहासिक नोंद आहे. या घटनेला यंदा ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १५ व १६ एप्रिल २०२६ रोजी भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्ताने आयोजकांशी संवाद साधत आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी नियोजनाचा आढावा घेतला तसेच महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. हा महोत्सव इतिहासाचे जतन व संवर्धन करत नव्या पिढीपर्यंत शिवचरित्राची प्रेरणा पोहोचवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने राणी गुणवंताबाई राणीसाहेब यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.

या पाहणी दौऱ्यात करवंद महोत्सव (Karwand Festival 2026) समितीचे अध्यक्षअरविंद देशमुख, गुणवंताबाईंचे वंशज हरीरुद्रप्रसाद इंगळे, गणेश बाहेकर, प्रा.रमेश पाटील, राजू बरडे, नारायण जवंजाळ, अक्षय करंडे, मनोज लाहुडकर, रोहन करंडे, सुभाष करंडे, संतोष जराड, सुनील करंडे, देविदास जाधव, गजानन जाधव, अनिल राठोड, गोपाळ चव्हाण, रामेश्वर इंगळे, नारायण गरड, ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक देशमुख, किरणराजे जाधव, नारायण सुर्वे यांच्यासह इतिहास संशोधक प्रा. विजय घ्याळ, निलेश इंगळे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शौर्यगाथा जगासमोर यावी- प्रा. नरेंद्र खेडेकर 

गुणवंताबाई इंगळे यांचे वडील शिवाजीराजे इंगळे, भाऊ काताजी इंगळे, माणकोजी दहातोंडे, मोहिते, राजेंजाधव, सुर्वे यांच्यासारखे अनेक लढावय्ये वीर स्वराज्याला देणारी करवंडची भूमी असून हा शौर्याचा इतिहास नवीन पिढीसमोर यावा यासाठीच करवंड मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून असून गावकऱ्यांनी करवंड मोहोत्सव समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी करवंड भेटीप्रसंगी केले.

संबंधित सामग्री

Nobel Prize 2026: मेंदूतील पेशींवर प्रकाशाद्वारे नियंत्रण; Deisseroth, Hegemann आणि Nagel यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

Nobel Prize 2026: मेंदूतील पेशींवर प्रकाशाद्वारे नियंत्रण; Deisseroth, Hegemann आणि Nagel यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल

Karl Deisseroth, Peter Hegemann आणि Georg Nagel यांना २०२६चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. Channelrhodopsin आणि Optogeneticsच्या शोधामुळे प्रकाशाच्या मदतीने मेंदूतील चेतापेशींवर नियंत्रण शक

Oct 05, 2026
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराविरोधात कठोर कायदा येणार?

West Bengal UCC: पश्चिम बंगालच्या राजकारणात समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू करण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालमध्ये लवकरच UCC लागू

Oct 05, 2026
DMartच्या कमाईत मोठी वाढ; महसूल 19 हजार कोटींच्या पुढे

DMartच्या कमाईत मोठी वाढ; महसूल 19 हजार कोटींच्या पुढे

DMartच्या दुसऱ्या तिमाहीच्या महसुलात 18.4% वाढ झाली असून कंपनीचा स्वतंत्र महसूल 19,206.18 कोटींवर पोहोचला. स्टोअर्सची संख्या 518 वर गेली.

Oct 04, 2026
ई-पंचनाम्याचा गवगवा कागदावरच; रिसोड तालुक्यात नुकसानीचे पंचनामे जुन्याच ऑफलाइन पद्धतीने!

ई-पंचनाम्याचा गवगवा कागदावरच; रिसोड तालुक्यात नुकसानीचे पंचनामे जुन्याच ऑफलाइन पद्धतीने!

E-Crop Survey 2026: राज्य शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यानंतर बाधित पिकांचे व नुकसानग्रस्त भागाचे प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश जारी केले होते. आदेशानुसार रिसोड तालुक्यात प्रत्यक्ष पंचनामा

Oct 04, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026