मुंबईतील नोकरीसाठी ‘फक्त गुजराती-मारवाडी’ अट; नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीवरून वाद

सोशल मीडियावर अलीकडेच इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी उपस्थित केलेल्या सोसायटीतील ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादानंतर आता रोजगार क्षेत्रातील एका जाहिरातीमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

मुंबईतील नोकरीसाठी ‘फक्त गुजराती-मारवाडी’ अट; नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीवरून वाद

Job Controversy

अहमदाबादस्थित भरती एजन्सीचे स्पष्टीकरण; कंपनीच्या गरजेनुसार भाषिक कौशल्याचा निकष लावल्याचा दावा

(Job Controversy) सोशल मीडियावर अलीकडेच इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांनी उपस्थित केलेल्या सोसायटीतील ‘पांढऱ्या पट्टी’च्या वादानंतर आता रोजगार क्षेत्रातील एका जाहिरातीमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवर प्रसिद्ध झालेल्या एका भरती जाहिरातीत विशिष्ट भाषिक समुदायाचा उल्लेख करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला असून मराठी उमेदवारांना संधीपासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे.

अहमदाबादस्थित एका भरती एजन्सीने मुंबईतील EGM तसेच अकाउंट्स-फायनान्स पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांचे वेतन प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र पात्रतेच्या निकषांमध्ये ‘फक्त गुजराती-मारवाडी अर्जदार’ असा उल्लेख करण्यात आल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

मुंबईतील नोकऱ्यांसाठी विशिष्ट भाषिक समुदायालाच प्राधान्य का दिले जात आहे, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. यासोबतच मराठी तरुणांना रोजगार प्रक्रियेतून वगळले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. त्यामुळे या जाहिरातीवरून भाषिक भेदभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वाद वाढल्यानंतर संबंधित भरती एजन्सीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, त्यांची कंपनी विविध संस्थांसाठी मनुष्यबळ भरती आणि प्लेसमेंटचे काम करते. वेगवेगळ्या कंपन्यांच्या गरजा लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. एखाद्या पदासाठी विशिष्ट भाषेचे ज्ञान आवश्यक असल्यास त्या अनुषंगाने जाहिरात प्रसिद्ध केली जाते, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, त्यांच्या माध्यमातून भरती होणाऱ्या कंपन्यांमध्ये कोणत्याही एका जातीचे किंवा भाषिक गटाचे वर्चस्व नसून विविध राज्यांतील आणि विविध भाषा बोलणारे कर्मचारी कार्यरत असल्याचा दावा एजन्सीने केला आहे. त्यामुळे जाहिरातीचा चुकीचा अर्थ काढू नये, असेही त्यांनी नमूद केले आहे.

तथापि, या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून “मुंबईतील मराठी युवकांनी रोजगारासाठी नेमके कुठे जायचे?” असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मराठी, गुजराती आणि मारवाडी समुदायांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, संबंधित कंपनी आणि भरती एजन्सीविरोधात कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली असून रोजगार प्रक्रियेत भाषिक निकषांचा वापर कितपत योग्य आहे, यावर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026