हिंगोली कोरडा दुष्काळ

हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार संतोष बांगर यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी

Hingoli Dry drought: हिंगोली जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके वाळून चालली असून जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर

हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार संतोष बांगर यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी

Hingoli Dry drought

हिंगोली (Hingoli Dry drought) : हिंगोली जिल्ह्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके वाळून चालली असून जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटी झालेल्या पेरणीनंतर पावसाने जवळपास महिनाभरापासून पाठ फिरवली आहे. कळमनुरी, हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर ही पिके करपून गेली आहेत. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

 मुंबईत आमदार बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, हिंगोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४० ते ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. अनेक मंडळांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. विहिरी, तलावांनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

"मी स्वतः शेतकरी आहे, शेतात जाऊन परिस्थिती पाहिली आहे. सोयाबीनची शेंग भरलीच नाही, कापसाचे बोंड सुकून गेले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पीक विमा, विज बिल माफी आणि चारा छावण्या यासारखी मदत द्यावी. माझ्या शेतकऱ्याला ३०-४० टक्के नको, तर १०० टक्के मदत मिळाली पाहिजे," अशी भूमिका आमदार बांगर यांनी मांडली. यावेळी त्यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील शिवसेना आमदार कल्याणकर यांचीही उपस्थिती होती.

या मागणीची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाला तातडीने पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.

टैग्स: Hingoli Dry drought

संबंधित सामग्री

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी जि.प.च्या महिला शिक्षिका बळीराजाच्या बांधावर

Hingoli Dry Drought: हिंगोली जिल्ह्यात मागील २० दिवसात १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना, कोरड्या दुष्काळामुळे हतबल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी जि प महिला शिक्षिका शेतकऱ्यांच्या बांधावर

Oct 02, 2026
हिंगोली जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा; शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची शिवसेना उबाठाची मागणी

हिंगोली जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा; शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची शिवसेना उबाठाची मागणी

Hingoli Dry Drought: हिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच हिंगोली जिल्ह्यातून प्रस्तावित असलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द

Sep 11, 2026