मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

CEC Gyanesh Kumar: विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करावी..

‘मत चोरी’च्या आरोपावरून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फीची मागणी

CEC Gyanesh Kumar

 

जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजीमंत्री यशोमती ठाकुर त्यांच्या नेतृत्ववात निवेदन 

अमरावती (CEC Gyanesh Kumar) : विशेष सखोल पुनरावृत्ती (एसआयआर) प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री यशोमती ठाकुर, खा बळवंत वानखड़े यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने स्वतंत्र व निष्पक्षपणे निवडणुका पार पाडणे अपेक्षित आहे. मात्र, एसआयआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचा संदर्भही निवेदनात देण्यात आला आहे.

निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत किमान १४ वेळा मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे व पुनर्स्थापित करणे तसेच निवडणूक आयोगाच्या माहिती-तंत्रज्ञान प्रणालीशी संबंधित निर्णयांवर आक्षेप नोंदवले होते. काही निर्णय आपल्याला माहिती न देता घेण्यात आल्याचे त्यांनी नोंदवल्याचे वृत्तात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप केले असून, लोकशाही व घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४, बिहार आणि पश्चिम बंगालमधील मतदार यादीच्या प्रक्रियेबाबतही विविध आरोप करण्यात आले आहेत.

दरम्यान, निवडणूक आयोगातील सूत्रांनी या अंतर्गत मतभेदांच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना एसआयआरसह आयोगाचे सर्व निर्णय तीनही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने झाल्याचे म्हटले आहे. निवेदनाद्वारे काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यावेळी शिष्टमंडलात यशोमतीताई ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, बबलूभाऊ देशमुख,वीरेंद्रभाऊ जगताप, राजकुमार पटेल,हरिभाऊ मोहोड, कांचनमाला गावंडे,जयंतराव देशमुख,मुकद्दर खा पठाण,प्रदीप देशमुख, राहुल येवले,शैलेश गवई, रामेश्वर अभ्यंकर,रजनीताई बेलसरे,प्रमोद दाळू,सुरेश साबळे, रमेश सावळे, प्रवीण मनोहर,डॉ.रवींद्र वाघमारे,पंकज वानखडे, सुनील गावंडे,अमोल होले,श्रीनिवास सूर्यवंशी,प्रदीप देशमुख,हरीश मोरे, गजानन देशमुख,प्रकाश काळे,गजानन पाथरे, मुरलीधर नाईक, महेंद्र गैलवार,राजेश सेमलकर,विलास बोरेकर, राजू कुऱ्हेकर,चंदू डहाणे, विनोद चौधरी, दिलिप काळबांडे, मुकुंद देशमूख,दीपक सवई, किशोर देशमुख, राजाभाऊ बंड, बाबुभाई इनामदार, बाबाराव बहुरूपी, अभय देशमुख, नामदेव तनपुरे,वैभव वानखडे, श्रीकांत झोडपे, प्रमोद कांबळे, इतेशाम नबील, शहजाद पठाण,सेतू देशमूख नितेश वानखडे, उत्कर्ष देशमुख,शंतनु निचित, मयूर देशमुख इत्यादी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026