ताकतोडा आरोग्य विभाग

ताकतोड्यात आरोग्य विभागाचे पथक दाखल; डेंग्यूसदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर घराघरांत सर्वेक्षण

Taktoda Health Department: तालुक्यातील ताकतोडा येथे डेंग्यूसदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी ता. २ रोजी भेट देत कीटकशास्त्रीय व जलद ताप सर्वेक्षण केले.

ताकतोड्यात आरोग्य विभागाचे पथक दाखल; डेंग्यूसदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर घराघरांत सर्वेक्षण

Taktoda Health Department

सेनगाव (Taktoda Health Department) : तालुक्यातील ताकतोडा येथे डेंग्यूसदृश आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी ता. २ रोजी भेट देत कीटकशास्त्रीय व जलद ताप सर्वेक्षण केले. ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली.

पथकाने घराघरांत ॲबेटिंग करून डासांच्या उत्पत्तीस्थळांची पाहणी केली. संशयित डेंग्यू रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. नागरिकांना ‘कोरडा दिवस’ पाळणे, परिसर स्वच्छ ठेवणे व पाणी साचू न देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी माशांची पैदास केंद्रे उभारण्याची सूचनाही करण्यात आली.

दरम्यान, १९८४ मध्ये बांधलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीत गाळ साचल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून, नवीन टाकी वापरात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (Taktoda Health Department) पाण्याच्या टाकीची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून पाण्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गावातील सुमारे दहा नागरिक डेंग्यूसदृश लक्षणांमुळे वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मात्र, त्यांना डेंग्यूचे अधिकृत निदान झाले आहे की नाही, हे तपासणी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

पथकात एस. एस. पवार (ADMO), आर. बी. जोशी (आरोग्य निरीक्षक), एस. एस. बोरबळे (कीटक समारक), जगताप (आरोग्य पर्यवेक्षक) यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगावचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांचा सहभाग होता.