Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आरोग्य

उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव

Sub-District Hospital Kurkheda: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा अंतर्गत मागील वर्षभरात हृदयरोग, जन्मजात विकृती, तसेच इतर विविध शस्त्रक्रियांसाठी पात्र बालकांची तपास


जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव

Sub-District Hospital Kurkheda |

कुरखेडा (Sub-District Hospital Kurkheda)  : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा अंतर्गत मागील वर्षभरात हृदयरोग, जन्मजात विकृती, तसेच इतर विविध शस्त्रक्रियांसाठी पात्र बालकांची तपासणी, निदान, संदर्भ सेवा आणि उपचार  तसेच नुकत्याच झालेल्या हृदयरोग निदान शिबिरामध्ये अधिकाधिक  हृदरोग  बाधित बालकांना  उपस्थित ठेवून 2 डी इको तपासणी व त्यावर औषधोपचार उपचार करवून घेतला,तसेच सत्र 2025 - 2026 मध्ये  कुरखेडा तालुक्यातील 5 हृदयरोग बाधित बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया व इतर हायड्रोसिल, हर्निया ,अंडीसेंडेंट टेस्टीज, हायपोस्पेडियसिस , अपेंडिक्स अशा प्रकारच्या 50 मोफत शस्त्रक्रिया करवून  उल्लेखनीय कामगिरी  केल्याबद्दल आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकाऱ्यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमित ठमके, डी.इ .आय. सी .व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधील  वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश बोरकर ,डॉक्टर अर्चना गऱ्हाटे, डॉ.प्राजक्ता दुपारे ,डॉक्टर प्रशांत देशमुख, डॉक्टर स्नेहा कृपाल, डॉक्टर अंकित बोरसरे ,यांनी दुर्गम व आदिवासी भागातील बालकांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवत अनेक बालकांना वेळेत उपचार मिळवून दिले. विशेषतः जन्मजात हृदयरोग, ओठ-टाळू विदीर्ण, मोतीबिंदू, हर्निया, तसेच इतर आवश्यक शस्त्रक्रियांसाठी बालकांना उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, "राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा बालकांच्या निरोगी भविष्याचा मजबूत पाया आहे. प्रत्येक पात्र बालकापर्यंत सेवा पोहोचवून त्यांना वेळेत उपचार मिळवून देणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असून, सर्वांनी यापुढेही याच समर्पणाने कार्य करावे," असे आवाहन केले.

सन्मानित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा गौरव संपूर्ण आरोग्य विभागाच्या सामूहिक कार्याचे फलित असल्याचे सांगत, भविष्यातही बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ग्वाही दिली. या सन्मान सोहळ्यामुळे उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत औषध निर्माण अधिकारी विनोद दुपारें ,हेमंत बोरकर ,धम्मप्रिय झाडे ,परिचारिका टिकेश्वरी करमकार ,वर्षा दुमाने ,इत्यादी कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला असून, बालकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवचैतन्य निर्माण झाले आहे.