Maharana Pratap Jayanti: मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंबही अर्पण करणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त एकूण १०४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
देशाभिमान, शौर्य आणि समाजसेवेचा अनोखा संगम
चिखली (Maharana Pratap Jayanti) : हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या 486 व्या जयंतीनिमित्त चिखली व कव्हळा येथे आयोजित रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंबही अर्पण करणाऱ्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त एकूण १०४ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली.
चिखली येथे आयोजित रक्तदान शिबिरात श्री सत्य साई ब्लड सेंटर, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे संजय गुलाबराव चव्हाण, भिकाजी रामभाऊ नलिंदे, उमेश मधुकर फिरके, विकास गुरुदासानी, तुळशीराम पहाडसिंग मोरे, आनंथा माधवराव गाडेकर, श्रीकांत विश्वनाथ सोळंकी, कन्हैयालाल भोजवानी, सुनील माधवराव चवरे, नंदकिशोर रामदास सोळंकी, सूरज आंबदास खरात, डॉ. धनंजय परिहार, विश्वजित पाटील, विनोद नामदेव जाधव, अभयसिंग कैलास परिहार, वैभव सतीश डुकरे, स्वप्निल कासारे, कडूबा शामराव पवार, प्रविण हिवाळे, रोहन गणेश माने, सिद्धेश्वर शेषराव महाले, संतोष सुधाकर महाले, वैभव गजानन ठेंग, सागर गजानन जाधव, गोपाळ पडघान, सोपान परिहार, रामेश्वर रुस्तम सुराडकर, राजू ससमल, संजय परिहार, रमेश सोळंकी, नंदू शेषराव चोपडे, सोहम सुरडकर, आकाश हाडे, अतुल सुरेश सदार, विजय तुकाराम वानखेडे आणि निलेश भुसारी यांनी रक्तदान केले.
जीवनधारा ब्लड बँक, चिखली यांच्याकडे विशाल सुरेश नागरिया, संदीप सिताराम राऊत, शुभम सखाराम जाधव, प्रसाद तेजराव पवार, विलास रामदास सोळंकी, किशोर भारत जाधव, सूरज गजानन इंगळे, नवलसिंग निवृत्ती पवार, कैलास पंजाबराव ठेंग, विशाल नामदेव सोळंकी, प्रमोद सुभाष इंगळे, हेमंत जयराज कुचेरिया, संदीप हिरालालजी श्रीवास्तव, छोटू सुधाकर कांबळे, गजानन सिद्धार्थ जाधव, वैभव प्रकाश परिहार, परमेश्वर एकनाथ इंगळे, अतुल तेजराव सोळंकी, अभिजीत सुभाषअप्पा बोंद्रे, आशुतोष भारत गाडे, रोहन भानुदास पवार, सौरभ सिद्धू सोळंकी, हर्षल शिवदास सोळंकी, गोविंदा भिकाजी सोळंकी, ऋषिकेश हिंमतसिंग सोळंकी, शैलेश विष्णू सुराडकर, किरण लक्ष्मण सोळंकी, संतोष रामभाऊ काळे, पांडुरंग गजानन सोळंकी, ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव, डॉ. मंगेश गजानन मुंडे, रतनसिंग परिहार, डॉ. वैभव राजेश सुरडकर, रामप्रसाद सुरडकर, गणेश अशोक ठेंग, संतोष रमेश मांडवे, आदित्य संजय जाधव आणि अनिकेत संजय दळवी यांनी रक्तदान केले.
तसेच महाराणा प्रताप जयंती (Maharana Pratap Jayanti) उत्सव समिती, कव्हळा यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात दिलीप साहेबराव इंगळे, डॉ. अजय सिद्धेश्वर सुरशे, आकाश संजय सुरशे, अजिंक्य वासुदेव महाले, श्रीकांत विनायक महाले, अजय संजय डाळीमकर, सागर दिलीप साळोख, हनुमान सुधाकर महाले, विशाल गजानन महाले, रामेश्वर भगवान सुरशे, पवन जानराव सुरशे, प्रमोद जनार्धन महाले, गोपाळ राजाराम महाले, प्रभू हरिदास महाले, रामभाऊ आत्माराम महाले, शैलेंद्र रमेशसिंग राजपूत, किशोर योगीराज इंगळे, सुदर्शन ओमकार राऊत, रमेश मुरलीधर महाले, लक्ष्मण आत्माराम महाले, पंकज राजू भगत, गणेश तेजराव कौसे, शुभम विष्णू महाले, संजय गुलाबसिंग सोळंकी, रामदास तुळशीदास महाले, संदीप वसंता हराळ, निखिल जयसिंग इंगळे, आकाश मंगलसिंग इंगळे, ऋत्विक रामभाऊ महाले आणि सिद्धेश्वर गजानन महाले यांनी रक्तदान करून महाराणा प्रताप यांना अभिवादन केले.
महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत रक्तदात्यांनी समाजसेवेचे व्रत जपले. रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून हा उपक्रम महाराणा प्रताप यांच्या जयंतीला साजेसा ठरल्याची भावना समाजमात व्यक्त केली जात आहे.