Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > आरोग्य

पल्स पोलिओ लसीकरण

28 जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Pulse Polio Immunization : पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार


28 जून रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Pulse Polio Immunization |

 

0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे आवाहन

चिखली (Pulse Polio Immunization) : दिनांक 28 जून 2026 रोजी तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. तहसीलदार  विजय सवडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचे डोस देऊन मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने गावागावात आणि शहरी भागात विशेष लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 28 जून रोजी बालकांना पोलिओचे डोस देण्यात येतील. तसेच ज्या बालकांपर्यंत केंद्रावर पोहोचणे शक्य होणार नाही, अशा बालकांसाठी पुढील तीन दिवस घराघरांत जाऊन पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत. (Pulse Polio Immunization) पोलिओमुक्त भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रत्येक पालकाने आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.