Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आरोग्य

हिंगोली रक्तदान शिबिर

रक्तदानातून जीवनदानाचा संदेश; हिंगोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Hingoli Blood Donation:जीतांजली चॅरिटेबल ट्रस्ट व हिंगोलीचे शहराधिकारी यांच्यामध्ये संयुक्त प्रयासाने भव्या शिबिराची सुरुवात. तरुण आणि महिलांनी पहिले रक्तदान केले, मधील सामाजिक कार्यासाठी सत्कार झाला.


रक्तदानातून जीवनदानाचा संदेश हिंगोलीत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Hingoli Blood Donation Camp |

हिंगोली (Hingoli Blood Donation Camp) : जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून गीतांजली चॅरिटेबल ट्रस्ट आणि शासकीय रुग्णालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आज गीतांजली मेडिकल, NTC येथे 14 जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. "रक्तदान हेच श्रेष्ठदान" या संदेशाने भारावलेल्या या शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

शिबिराचे उद्घाटन महेश्वरी समाज जिल्हा अध्यक्ष प्रमोद मुंदडा व व्यापारी संघटना जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष सुमित चौधरी, पवन राठी, रमण झंवर, अमित चांडक, ज्योती वाघमारे, सारिका कयाल, अर्चना सोनी, वंदना धूत, दीपा झांजरी, लता बालदी, संजय लामदाडे, अरूण कोंडेकर, श्रावण यादव, महेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

या (Hingoli Blood Donation Camp) शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणाईचा सहभाग. साक्षी बालदी, सीमा बालदी, हर्षद तोष्णीवाल आणि कृष्णा बालदी यांनी प्रथमच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कार्यक्रमात अखिल भारतीय मारवाडी महिला मंचातर्फे राजेश बालदी यांचा सामाजिक कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. 

शिबिर यशस्वी करण्यासाठी राजेश बालदी, गोविंद बालदी, अक्षय लष्करे व जीत बालदी यांनी परिश्रम घेतले. शिबिरात रक्तदानासोबतच मोफत रक्तगट तपासणीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. "आपल्या एका रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते" हा संदेश देत आयोजकांनी अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.