Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आरोग्य

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जिल्हा रुग्णालयास अचानक भेट

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा, स्वच्छता, सुविधा आणि गुणवत्तेवर आढावा घेतला. त्यांनी एनक्वास मानांकनासाठी आवश्यक सुधारणांचे निर्देश


जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जिल्हा रुग्णालयास अचानक भेट

Collector Rahul Gupta |

 

आरोग्य सेवांचा घेतला आढावा; एनक्यूएएस नामांकनासाठी गुणवत्तावृद्धीच्या सूचना

हिंगोली (Collector Rahul Gupta) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाला नुकतीच अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यामध्ये बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभाग, प्रसूती कक्ष, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार तसेच स्वच्छतागृहांचा समावेश होता. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच रुग्णालयातील आरोग्य सुविधा, स्वच्छता, मनुष्यबळ उपलब्धता व वैद्यकीय यंत्रणेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन एनक्वास (NQAS) प्राप्त करण्याच्या अनुषंगाने तिसरी आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत रुग्णालयातील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. एनक्वॉस च्या मानाकनांची पूर्तता केल्यानंतर अशा प्रकारे गुणवत्तापूर्ण सेवा देणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ठरणार आहे. रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण नोंद व्यवस्थापन, औषधांची उपलब्धता, प्रसूती कक्ष, आपत्कालीन सेवा, प्रयोगशाळा सुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी विविध विभागांना भेट देत तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपचारांबाबत माहिती घेतली. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी रुग्णालयातील दिशादर्शक फलक, सेवा कार्यरत डॉक्टरांची यादी (ड्युटी लिस्ट), मिळणाऱ्या विविध सुविधांची यादी  लावण्यात आलेली निदर्शनास आली. तसेच बाह्यरुग्ण विभागात असलेले काही विभागाचे कार्यालय हे जिल्हा परिषदेमध्ये हलविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, शिवाय रुग्णांना रक्त तपासणीकरिता  प्रयोगशाळेत न जाता बाह्यरुग्ण विभागात रक्ताचे नमुने घेण्यासाठी कलेक्शन सेंटर सुरू करण्यास सांगितले. यामुळे बाह्यरुग्ण विभागात विविध डॉक्टरांना व विभागांना जास्त प्रमाणात जागा उपलब्ध होऊन रुग्णांची सोय एकाच ठिकाणी होईल.

दरम्यान, जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत तंबाखूविरोधी जनजागृतीपर स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत तंबाखूमुक्त व निरोगी जीवन जगण्याचा संकल्प केला. या भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ नितीन पुरोहित व सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.