रुग्णालय डिजिटल सुविधा

आता रुग्णालयातही डिजिटल सुविधा; क्यूआर स्कॅन करा अन् रांगेचा त्रास टाळा!

Hospital Digital System: रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रांगेत बराच वेळ उभे राहावे लागत होते. हा त्रास दूर करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने क्यूआर स्कॅन सिस्टिम सुरू केली असून, आता मोबाईलवरूनच तपासणी

आता रुग्णालयातही डिजिटल सुविधा; क्यूआर स्कॅन करा अन् रांगेचा त्रास टाळा!

Hospital Digital System

 

मोबाईलवरच मिळणार उपचाराचा नंबर

मूर्तिजापूर (Hospital Digital System) : शहरासह तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेचा आधारवड ठरलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दररोज सुमारे ६०० ते ७०० रुग्णांची तपासणी केली जाते. त्यामुळे उपचारासाठीची चिठ्ठी काढताना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना रांगेत बराच वेळ उभे राहावे लागत होते. हा त्रास दूर करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने क्यूआर स्कॅन सिस्टिम सुरू केली असून, आता मोबाईलवरूनच तपासणीचा नंबर मिळणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी (Hospital Digital System) मोबाईलमध्ये संबंधित ‘ड्रिफकेस’ अॅप डाउनलोड करून रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर उपचारासाठीचा क्रमांक मोबाईलवरच मिळणार असल्याने चिठ्ठी काढण्यासाठी रुग्णांना स्वतंत्र रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.ग्रामीण भागातून पहाटेपासून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी ही सुविधा विशेष दिलासादायक ठरणार आहे.

वयोवृद्ध, महिला, दिव्यांग तसेच गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना रांगेत दीर्घकाळ उभे राहण्याचा त्रास सहन करावा लागत होता. आता (Hospital Digital System) मोबाईलवरून नंबर मिळणार असल्याने रुग्णांचा वेळ वाचण्यासोबतच रुग्णालयातील गर्दी आणि रांगांचे व्यवस्थापन करण्यासही मदत होणार आहे. मोबाईलचा वापर न करणारे ज्येष्ठ नागरिक तसेच तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या रुग्णांना क्यूआर कोड स्कॅन करून नंबर मिळविण्यास अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा रुग्णांना मदत करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने स्वतंत्र मार्गदर्शन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

टैग्स: Hospital Digital System