हिंगोली (Free health camp) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने भारत सरकारच्या “अटल वयो अभ्युदय योजना” (राष्ट्रीय वयोश्री योजना) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सहाय्यक उपकरणे वाटपासाठी नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २१ मे २०२६ रोजी गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या (Free health camp) शिबिरामध्ये पात्र लाभार्थ्यांना गरजेनुसार व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे, वॉकर, काठ्या, कमोड चेअर तसेच कृत्रिम दात (कवळी) यांसारखी सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक पात्र लाभार्थ्यास अंदाजे १२ हजार ५०० रुपये पर्यंतच्या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांचे वय ६० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) धारक असावा किंवा त्यांचे मासिक उत्पन्न रु. १५ हजारांपेक्षा कमी असावे. यासाठी तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्राच्या दोन छायांकित प्रती, आधार कार्डाच्या दोन छायांकित प्रती तसेच दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक राहणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पूर्व नोंदणीसाठी दत्तात्रय मगर, समाजसेवा अधीक्षक, मो. ९३७३३७०७२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल यांनी केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सहाय्यक उपकरणे वाटपासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन
Free health camp:हिंगोलीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व सहाय्यक उपकरणे वाटपासाठी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरात व्हीलचेअर, श्रवणयंत्र, चष्मे आणि इतर उपकरणे मोफत दिली जाणार आहेत.
Free health camp
संबंधित सामग्री
जळीत कांडावरून पुढार्यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर
Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल
Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय
Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा
Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल