Hingoli Cancer Camp: हिंगोलीत शासकीय महाविद्यालयात मंगळवारी कर्करोग आणि एनसिडी यांचे जनजागृती शिबिर आयोजित झाले. येथे १५६ रुग्णांचा तपासणी, दंत चिकित्सा, बायोप्सी व काही रुग्ण
हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिबिरास प्रतिसाद
हिंगोली (Hingoli Cancer Camp) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी विशेष एनसीडी व कर्करोग जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. श्रीचक्रधर मुंगल आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. दंत रोग तज्ञ व नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. फैसल खान यांच्या नेतृत्वाखाली मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग तपासणी व मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर व इतर आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमही घेण्यात आले.
या (Hingoli Cancer Camp) शिबिरात एकूण १५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८९ रुग्णांची दंत तपासणी झाली. एका रुग्णाची बायोप्सी घेण्यात आली, तर एका रुग्णावर आवश्यकतेनुसार डॉ. फैसल खान यांनी मुख- शस्त्रक्रिया व दंत शल्य शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली.
या शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. गीते, डॉ. दीपक मोरे, डॉ. गोल कदम, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. मनीष बगडिया, डॉ. शैलजा कुप्पास्वामी, डॉ. गोपाल कदम, डॉ. सतीश रूणवाल, डॉ. कंठे, डॉ. परदेशी, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. मंगेश मुटकुळे, डॉ. विवेक तटू, डॉ. अरविंद कळंबे, तालुका आरोग्य अधिकारी जोगदंड, शंकर तावडे, गारुडी, शोएब शेख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नियमित तपासणीद्वारे मधुमेह, रक्तदाब व कर्करोगासारख्या आजारांचे वेळीच निदान शक्य होते, असा संदेश या (Hingoli Cancer Camp) शिबिरातून देण्यात आला. नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.