रुग्णवाहिका महिला प्रसूती

रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यातच गर्भवती महिलेची प्रसूती

Ambulance Childbirth Case: काशी तांडा येथे रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला दीड तास वाट पाहावी लागली. अखेर खाजगी वाहनातून रुग्णालयात नेत असताना वाटेतच महिलेची प्रसूती

रुग्णवाहिका न मिळाल्याने रस्त्यातच गर्भवती महिलेची प्रसूती

Ambulance Childbirth Case

 

हिंगोलीत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा!

हिंगोली (Ambulance Childbirth Case) : हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील काशी तांडा येथे रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एका गर्भवती महिलेला दीड तास वाट पाहावी लागली. अखेर खाजगी वाहनातून रुग्णालयात नेत असताना वाटेतच महिलेची प्रसूती झाली.  

मिळालेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील काशी तांडा येथील गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या होत्या. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिके साठी संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने महिलेला दीड तासापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नातेवाईकांनी तिला खाजगी वाहनातून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.  

रुग्णालयात (Ambulance Childbirth Case) पोहोचण्यापूर्वीच वाटेतच महिलेची प्रसूती झाली. तातडीने आई आणि नवजात बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  
 
राज्याचे आरोग्यमंत्री सातत्याने नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन देतात. विधानसभेतही याबाबत माहिती दिली होती. मात्र गेल्या 6 महिन्यात हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसत आहे. आज पुन्हा एकदा याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली.  
या गंभीर प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिकांची अनुपलब्धता हा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.