Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आरोग्य

सरकारी एचआयव्ही किट्स

रस्त्याच्या कडेला झुडपात आढळले एचआयव्ही चाचणी किट्स!

Government HIV Kits: उदगीर जळकोट महामार्गावर मुख्य रस्त्याच्या कडेला सरकारी एचआयव्ही चाचणी किट्स झुडपात फेकले गेले. सरकारी साठा 'NACO SUPPLIES - NOT FOR SALE' लABELसह खुलेपण्यात आले.


रस्त्याच्या कडेला झुडपात आढळले एचआयव्ही चाचणी किट्स

Government HIV Kits |

 

लाखोंचा सरकारी साठा उघड्यावर फेकला; आरोग्य यंत्रणेतील ‘कचरा राज’ उघडकीस

हणमंत केंद्रे
उदगीर (Government HIV Kits) : 
सामान्य नागरिकांना औषधे, तपासण्या आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र दुसरीकडे सरकारी निधीतून खरेदी करण्यात आलेल्या एचआयव्ही चाचणी किट्सचा मोठा साठा चक्क झुडपात उदगीर जळकोट महामार्ग ५० च्या बाजूला नावंदी पाठीजवळ  मुख्य रस्त्याच्या कडेला झूडापात फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. 

या घटनेमुळे आरोग्य विभागातील निष्काळजीपणा, आर्थिक उधळपट्टी आणि कचरा व्यवस्थापनातील गंभीर अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मोकळ्या जागेत पोत्यामध्ये भरून टाकलेल्या या साठ्यात "Comb Aids-RS Advantage-ST HIV 1+2 Immunodot Test Kit" या एचआयव्ही निदानासाठी वापरण्यात येणाऱ्या किट्सच्या शेकडो बाॅक्सच्या पेट्या  पोत्यात भरून आणि आरपीआर (Government HIV Kits) चाचणी कीटस साहित्य आढळून आले. तसेच तपासणी साहित्याचे अनेक किट्स अजूनही मूळ पॅकिंगमध्ये असल्याचे दिसून आले आहे.जरी या कीटसची मुदत संपली आसली तरी ते साहीत्य रस्त्यावर फेकून कसे दिले.फेकून देता येते का हा मोठा प्रश्न आहे.एकीकडे शासकीय रुग्णालयांमध्ये साध्या-साध्या चाचण्यांसाठी गरिबांना पदरचे पैसे मोजावे लागत असताना, दुसरीकडे मात्र आरोग्य विभागाच्या एका संतापजनक आणि क्रूर कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेला (NACO) मोफत पुरवण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि महागड्या HIV (एड्स) आणि सिफिलीस (गुप्तरोग) चाचणीच्या शेकडो किट्स चक्क उघड्यावर रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

​रस्त्याशेजारी कचऱ्यात, मातीत आणि झाडीझुडपात पडलेल्या या किट्सचे विदारक दृश्य पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या महापापाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

NOT FOR SALE' चा फलक, पण किंमत शून्य!

​रस्त्यावर फेकून दिलेल्या या साहित्यामध्ये 'Comb Aids-RS' या ब्रँडच्या HIV 1+2 चाचणी किट्स आणि 'RPR Test Kit' (सिफिलीस चाचणीसाठी) मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या आहेत. या सर्व पाकिटांवर स्पष्ट अक्षरात 'NACO SUPPLIES - NOT FOR SALE' (शासकीय पुरवठा - विक्रीसाठी नाही) असे लिहिलेले आहे. सरकार या किट्सवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. मात्र, गरजू रुग्णांपर्यंत या किट्स पोहोचवण्याऐवजी त्या थेट रस्त्यावर फेकून देऊन सरकारी पैशांची आणि औषधांची होळी करण्यात आली आहे.

मुदत संपली (Expired) म्हणून हे कृत्य?

मिळालेल्या माहितीनुसार, फेकून दिलेल्या काही स्ट्रिप्सच्या मागील बाजूची तपासणी केली असता, त्यावर उत्पादन तारीख २०२२ (MFG DATE: 2022-07-29) आणि मुदत संपण्याची तारीख २०२४ (EXP DATE: 2024-07-29) अशी नोंद असल्याचे दिसते. ​यावरून स्पष्ट होते की, सरकारी गोदामांमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये या किट्स वेळेत वापरल्याच गेल्या नाहीत. त्या तशाच पडून राहिल्या आणि मुदत संपल्यानंतर (Expiry झाल्यानंतर) आपले पाप लपवण्यासाठी कोणीतरी अज्ञात अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी त्या रात्रीच्या अंधारात रस्त्याशेजारी फेकून दिल्याचा दाट संशय आहे.

सरकारी पैशांचा कचरा; जबाबदार कोण?

या (Government HIV Kits) किट्सवर नमूद माहितीनुसार त्या राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पुरविण्यात आल्याचे दिसते. म्हणजेच हा साठा थेट सार्वजनिक पैशातून खरेदी करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. मग लाखो रुपयांचे साहित्य वापराअभावी कालबाह्य झाले का? त्याचे योग्य नियोजन का झाले नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा साहित्याची नियमांनुसार विल्हेवाट न लावता ते उघड्यावर कोणी फेकले? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
 

जैववैद्यकीय कचरा थेट निसर्गाच्या कुशीत
वैद्यकीय साहित्य, चाचणी किट्स आणि त्यातील घटक हे जैववैद्यकीय कचऱ्याच्या श्रेणीत मोडतात. अशा साहित्याची विल्हेवाट निश्चित प्रक्रियेनुसार लावणे बंधनकारक असताना हा साठा चक्क झुडपात मुख्य रस्त्याच्या बाजूला  टाकण्यात आल्याचे चित्र धक्कादायक आहे.
आरोग्य विभागाकडूनच नियमांची पायमल्ली केल्याचे दिसुन येत आहे.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर नाही ना?
इतक्या मोठ्या प्रमाणावर (Government HIV Kits) एचआयव्ही चाचणी किट्स एकाच ठिकाणी फेकून देण्यात आल्याने केवळ निष्काळजीपणाचा नव्हे तर काहीतरी लपवण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. कालबाह्य झालेला साठा, खरेदीतील अनियमितता किंवा व्यवस्थापनातील त्रुटी यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला का, याची चौकशी होणे आवश्यक आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी
या प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मूदत संपली तरी फेकून देता येता नाही ...जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ.प्रदीप ढेले
  अश्या कीटस फेकून देता येत नाही.त्याची व्यवस्थीत व्हिल्हेवाट लावावी लागते.आसे फेकुन देता येत नाही.त्याची चौकशी केली जाईल.तो साठा कुठला आहे याची चौकशी केली जाईल आसी माहीती जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ.प्रदीप ढेले यांनी सांगितले

उदगीर तालुक्यातील साठा व्यवस्थीत ...आयसीटीसी विभाग उदगीर
प्रथमदर्शनी पाहिलेल्या माहितीवरुन हा स्टॉक आमचा नसेल अशी माहीती उदगीर आयसीटीसी यांनी सांगीतले...

आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा आसून याची चौकशी करणार....जि.प.सदस्य   डाॅ,दिपक सोमवंशी
रस्त्याच्याकडेला महागडया किटस (Government HIV Kits) फेकून देणे हा आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा आसुन या संबंधीत जी यंञणा आहे त्या यंञणेची चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कारवाई केली जाईल.जनतेच्या आरोग्यासी संबंधीत आसल्याने यावर योग्यती चौकशी व कारवाई होण्यासाठी पाठपुरावा केला जाईल आसी माहिती जि.प,सदस्य डाॅ.दिपक सोमवंशी यांनी दिली.