नेत्रदान संकल्प

वाढदिवसानिमित्त केक नाही…तर ‘दृष्टी’ दिली!

गीता मुंडे यांनी आपल्या वाढदिवसावर नेत्रदानाचा संकल्प करून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.

वाढदिवसानिमित्त केक नाही…तर ‘दृष्टी’ दिली!

Geeta Munde

गीता मुंडे यांचा नेत्रदानाचा संकल्प!

उदगीर (Geeta Munde) : वाढदिवस म्हटला की केक, सेलिब्रेशन आणि शुभेच्छांचा वर्षाव…वाढदिवस म्हणजे केवळ केक-कटिंग आणि शुभेच्छांचा वर्षाव… पण हा ट्रेंड मोडत उदगीरमध्ये एक वेगळाच आदर्श घालून देत डोंगरशेळकी ता. उदगीर  येथील गीता मुंडे (Geeta Munde) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नेत्रदानाचा संकल्प करत समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.  वाढदिवसी थेट ‘दृष्टीदानाचा’ संकल्प करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या निर्णयाने “उत्सवापेक्षा योगदान मोठं!” हा संदेश ठळकपणे समोर आला आहे.डोंगरशेळकी येथील गिता हूलवंत मुंडे गृहिणी असून त्यांचे शिक्षण १२ वी पर्यत झाले आहे. गृहिणी असताना त्यांनी नेञदानाचा संकल्प करून समाजा समोर एक आदर्श निर्माण केला आहे.

उदगीर येथील लायन्स धर्मदाय नेत्ररुग्णालयात जाऊन त्यांनी नेत्रदानासाठी अधिकृत नोंदणी केली. एका साध्या वाटणाऱ्या निर्णयामागे असलेली संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रसंगी मुख्य अधिकारी उज्ज्वला हेंद्रे, समुपदेशक प्रशांत गायकवाड व जनसंपर्क अधिकारी गणेश मुंडे उपस्थित होते. सर्वांनी गीता मुंडे (Geeta Munde) यांच्या या धाडसी व समाजोपयोगी निर्णयाचे कौतुक केले आहे.  वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी देण्याची संधी आहे, हा विचार त्यांच्या कृतीतून ठळकपणे अधोरेखित झाला आहे.

“माझ्या डोळ्यांतून कुणाला तरी जग पाहता आलं, तर तोच खरा वाढदिवस!” गिता मुंडे
माझ्या डोळ्यांतून कुणाला तरी जग पाहता आलं, तर तोच खरा वाढदिवस
अशा हृदयस्पर्शी शब्दांत गीता मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्या (Geeta Munde) पुढे म्हणाल्या, “आपण गेल्यानंतर शरीर राख होणारच आहे; पण त्याआधी जर आपण अवयवदानाचा निर्णय घेतला, तर आपल्या अस्तित्वातून कुणाचं तरी आयुष्य उजळू शकतं.” “नेत्रदान हे श्रेष्ठ दान” असल्याचा संदेश देत त्यांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले. माझ्या डोळ्यांतून कुणाला तरी जग पाहता आलं, तर तोच खरा वाढदिवस- अवयवदानासाठी पुढे या… कारण तुमचा एक निर्णय कुणाच्या आयुष्यात ‘प्रकाश’ आणू शकतो! आसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नेञदानाच्या संकल्पाला पतीची ही साथ
गिता मूंडे (Geeta Munde) यांनी नेञदानाचा संकल्प करताच या संकल्पाला त्यांचे पती हुलवंत मुंडे यांनी   साथ देत नेञदान नोंदणीसाठी सोबत येवून नेञदानाचा नोंदणी केली.पत्नीच्या संकल्पाला पतीची साथ मिळाल्यामूळेच गिताने नेञदानाचा संकल्प पूर्ण केला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीत दुःखातूनही माणुसकीचा आदर्श; दंतवार कुटुंबीयांचा नेत्रदानाचा निर्णय

हिंगोलीत दुःखातूनही माणुसकीचा आदर्श; दंतवार कुटुंबीयांचा नेत्रदानाचा निर्णय

दंतवार कुटुंबीयांनी माणुसकीचा आदर्श जपत त्यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेतला.

Aug 24, 2026
दशनाम गोसावी समाजाचा २ ऑगस्टला लातूरमध्ये 'पंचसूत्री' सोहळा

दशनाम गोसावी समाजाचा २ ऑगस्टला लातूरमध्ये 'पंचसूत्री' सोहळा

Dashnam Gosavi Samaj: दशनाम गोसावी समाजाने देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी ऐतिहासिक आणि अतुलनीय योगदान दिले आहे. हा गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर ठेवूनच, समाजाला विकास

Jul 28, 2026
ज्ञानेश धनंजय कुलकर्णी यास पदवी प्रदान !

ज्ञानेश धनंजय कुलकर्णी यास पदवी प्रदान !

हिंगोली येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून तंत्रज्ञान पदवी, यंत्र अभियांत्रिकी ही पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली.

May 18, 2026
देवूळवाडीचा ऐतिहासिक विक्रम! एकाच गावातून चार जिद्दी तरुण पीएसआय पदावर

देवूळवाडीचा ऐतिहासिक विक्रम! एकाच गावातून चार जिद्दी तरुण पीएसआय पदावर

भ्यासाच्या जोरावर उदगीर तालुक्यातील देवूळवाडी येथील चार तरुणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

May 02, 2026
हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

हिंगणघाटची सेजल जेसवानी वाणिज्य शाखेत जिल्ह्यात अव्वल

बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला असून, हिंगणघाट येथील सेजल सुनील जेसवानी हिने वाणिज्य शाखेत 96.35 टक्के गुण मिळवले.

May 02, 2026