Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आरोग्य

डायबेटिस पेशन्टचे उन्हाळ्यातील जीवन...

उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला की सर्वसामान्य माणसाला जसा त्रास होतो, त्यापेक्षा अधिक काळजी मधुमेह असलेल्या रुग्णांना घ्यावी लागते.


डायबेटिस पेशन्टचे उन्हाळ्यातील जीवन

Diabetes Care |

(Diabetes Care) उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला की सर्वसामान्य माणसाला जसा त्रास होतो, त्यापेक्षा अधिक काळजी मधुमेह असलेल्या रुग्णांना घ्यावी लागते. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा येणे आणि रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये चढ-उतार होणे ही समस्या अधिक वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात डायबेटिस पेशन्टचे जीवन अधिक शिस्तबद्ध आणि जागरूकतेने जगावे लागते. उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता). जास्त घाम आल्यामुळे शरीरातून पाणी आणि आवश्यक क्षार बाहेर जातात. यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. म्हणून डायबेटिस रुग्णांनी दिवसातून पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे. नारळपाणी, लिंबूपाणी (साखर न घालता), ताक यांसारख्या नैसर्गिक पेयांचा वापर केल्यास शरीर हायड्रेट राहते.

आहारावर नियंत्रण ठेवणे हे उन्हाळ्यात अधिक महत्त्वाचे ठरते. अनेकांना थंड पेये, आईस्क्रीम किंवा गोड पदार्थ खाण्याचा मोह होतो, पण हे पदार्थ साखरेचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे फळांमध्येही योग्य निवड करणे आवश्यक आहे. टरबूज, काकडी, पपई यांसारखी कमी साखर असलेली आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे खाणे फायदेशीर ठरते. संतुलित आहार, वेळेवर जेवण आणि जंक फूड टाळणे ही सवय अंगीकारणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात व्यायाम करताना विशेष काळजी घ्यावी लागते. जास्त उष्णतेमध्ये बाहेर व्यायाम केल्यास शरीरावर ताण येऊ शकतो. त्यामुळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करणे योग्य ठरते. चालणे, योगा आणि हलका व्यायाम यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि साखरेचे नियंत्रण ठेवणे सोपे होते.

याशिवाय त्वचेची आणि पायांची काळजी घेणेही डायबेटिस रुग्णांसाठी महत्त्वाचे आहे. जास्त घाम आणि उष्णतेमुळे त्वचेवर संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्वच्छता राखणे, सैलआणि सुती कपडे वापरणे आवश्यक आहे. पायांना जखम होऊ नये म्हणून योग्य चप्पल वापरणे आणि दररोज पायांची तपासणी करणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात औषध आणि इन्सुलिन साठवतानादेखील काळजी घ्यावी लागते. जास्त तापमानामुळे औषधांच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तापमानात औषधे ठेवणे महत्त्वाचे आहे.

एकंदरीत, उन्हाळ्यात डायबेटिस पेशन्टचे जीवन थोडे आव्हानात्मक असले तरी योग्य काळजी, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे ते पूर्णपणे निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकतात. जागरूकता आणि शिस्त हीच त्यांच्या निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

 

प्रमोद रत्नप्रभा रामकृष्ण निर्मळ
स्वास्थ प्रचारक मधुमेह
मुक्त भारत अभियान
पथ्रोट, ता. अचलपूर, जि. अमरावती
मो. नं.-९४२०७९८००३