Ajit Pawar Jayanti: राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची मुंबईत भेट घेऊन मोहम्मद नाजीम रजवी यांनी शिबिराची माहीती दिली
कळमनुरी (Ajit Pawar Jayanti) : राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजू भैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली कळमनुरी नगर परिषदे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी व हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी लाहन मुलाच्या हृदयात छिद्र आहे अशा रुग्णांची सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदरील शिबिर हे दिनांक २५ जुलै २०२६ ते १० ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
या शिबिरात कमलनयन बजाज हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. सचिन मुखेडकर, डॉ. महेश केदार, डॉ. महेंद्र सिंग परीहार व तसेच नांदेड येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. अच्युत कन्नावार या (Ajit Pawar Jayanti) तज्ञ डॉक्टरांकडून शिबिरात आलेल्या रुग्णाची रुग्णांची तपासणी करून एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी व लहान मुलांची सर्जरी मोफत करण्यात येणार आहे. शिबिरात आलेल्या रुग्णांची तपासणीनंतर बायपास सर्जरी चे रुग्णांची बायपास सर्जरी व लहान मुलांचा हृदयात छिद्र आहे. अशा रुग्णांची सर्जरी कमलनयन बजाज हॉस्पिटल व एमआयटी हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर येथे डॉ. महेश केदार व डॉ. महेंद्र सिंग परीहार हे करतील तर अति गंभीर असलेले रुग्णांची एन्जोप्लास्टी डॉ. सचिन मुखेडकर हे करतील.

नांदेड येथील संजीवनी हॉस्पिटल येथे अल्पदरात एन्जोग्राफी तपासणी
शिबिरात आलेल्या रुग्णाची संजीवनी हॉस्पिटल नांदेड येथे फक्त ३ हाजार रुपयांत एन्जॉग्रफी 2 डी इको ची तपासणी करण्यात येणार आहे. ठिकाणी डॉ. अच्युत कन्नावार हे रुग्णांची तपासणी करतील तर अँजिओग्राफी तपासणीनंतर रुग्णाला एन्जोप्लास्टी लागेल, अशा रुग्णांची डॉ. अच्युत कन्नावार हे एन्जोप्लास्टी करतील. शिबिरात आलेल्या रुग्णांनी केलेल्या सर्व तपासण्याचे रिपोर्ट सोबत आणावे.
सह्याद्री हॉस्पिटल हिंगोली येथे मोफत 2 डी इकोची तपासणी दि ८ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
हिंगोली येथील सह्याद्री हॉस्पिटल येथे दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी ११ ते ४ वाजेपर्यंत: छत्रपती संभाजी नगर व नांदेड येथील प्रसिद्ध नामांकित हृदयविकार तज्ञा कडुन शिबिरात आलेल्या रुग्णांची मोफत 2 डी इको ची तपासणी करण्यात येणार आहे. डॉ. सचिन मुखेडकर, डॉ महेश केदार, डॉ. महेंद्र सिंग परीहार, डॉ. अच्युत कन्नावार, डॉ. यशवंत पवार हे तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहे. तरी या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांनी आपली तपासणी करून घ्यावे, असे आवाहन कळमनुरीचे मा. उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री सुनिता ताई पवार हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची मंत्रालयात भेट घेऊन मोहम्मद नाजीम रजवी यांनी आयोजित केलेल्या शिबिराची माहिती दिली आहे.