एकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ (Soybean Seed Selling) : तालुक्यातील सुरवाडी येथील हनुमान मंदिरासमोर कोणताही पास परवाना नसताना स्वतःच्या फायद्यासाठी सोयाबीन बियाणे विक्री करणाऱ्या एकावर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने २० जून रोजी कारवाई करून सोयाबीनच्या दहा किलो वजनाच्या १४ बँग ज्याची किंमत ४२ हजार रुपये व पाच लाख रुपये किमतीचे एम एच २४ ए एस ४५५० हे वाहन जप्त करण्यात आले
कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की सुरवाडी येथे एक स्कार्पिओ गाडीमधील अनाधिकृत विद्या (Soybean Seed Selling) सोयाबीन बियाणेची विक्री करत आहे. यानंतर भरारी पथकातील मोहीम अधिकारी ए एस वायसे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक एल यू काळे, औंढा नागनाथ पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष पाचपुते यांनी घटनास्थळी दाखल होऊन कारवाई केली. बियाण्यासह स्कार्पिओ वाहन असा ५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी किशोर कोंडबाराव शेळके कृषी अधिकारी गुण नियंत्रण निरीक्षक तथा बियाणे निरीक्षक तालुका कृषी अधिकारी औंढा नागनाथ यांच्या फिर्यादीवरून रंजीत दामोदर पवार वय ४५ वर्षे राहणार मसला पोस्ट गुंज तालुका पाथरी जिल्हा परभणी यांच्यावर अवलंबनांना पोलिसांनी दिनांक २० जून रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे करत आहेत.