सेनगाव हळद हंगाम

मजुरांच्या टंचाईत ‘हळदीचा सोनेरी घाम’

Sengaon turmeric season: सेनगाव तालुक्यात हळदीच्या पिकाला अतिवृष्टी व मजुरांच्या टंचाईमुळे फटका. उत्पादनात ३०-४०% घट. शेतकरी वर्गातून सरकारकडे मदतीची अपेक्षा.

मजुरांच्या टंचाईत ‘हळदीचा सोनेरी घाम’

Sengaon turmeric season

सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांची कसरत वाढली...

सेनगाव (Sengaon turmeric season) : सेनगाव तालुक्यात यंदाचा हळद हंगाम शेतकऱ्यांसाठी तारेवरची कसरत ठरत असून, मजुरांच्या तीव्र टंचाईसह वातावरणातील बदलांनी अडचणीत भर टाकल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. एकीकडे खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने हळदीच्या पिकाला मोठा फटका बसला, तर दुसरीकडे काढणी व प्रक्रियेच्या टप्प्यात मजूर मिळत नसल्याने शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.

यावर्षी अतिवृष्टीमुळे हळद (Sengaon turmeric season) लागवड असलेल्या शेतात पाण्याचा मोठ्या प्रमाणात साठा झाला. परिणामी हळदीचे कंद सडण्याचे प्रमाण वाढले असून उत्पादनात सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आधीच निसर्गाच्या या अवकृपेने हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता काढणी आणि प्रक्रियेची नवी कसरत उभी ठाकली आहे.

मागील दोन आठवड्यांपासून तालुक्यात हळद काढणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र मजुरांच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना स्वतःच शेतात उतरावे लागत आहे. हळद उकडून त्यानंतर ती दोन आठवडे वाळवण्याची प्रक्रिया अत्यंत कष्टसाध्य आहे. सकाळ-संध्याकाळ ‘पावली’ देत हळद वाळवण्यासाठी शेतकरी आणि उपलब्ध मजूर जीवाचे रान करत आहेत.
या प्रक्रियेदरम्यान सतत पाण्यात व उन्हात काम केल्याने अनेकांच्या पायांना फोड येत आहेत, त्वचा सोलून निघत आहे; तरीही थांबायचे नाव नाही.

कारण हळद (Sengaon turmeric season) हे नगदी आणि तुलनेने खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक मानले जाते. मात्र या ‘सोनेरी पिकामागे’ दडलेला घाम, वेदना आणि संघर्ष याची जाणीव या निमित्ताने प्रकर्षाने समोर येत आहे. मजूर टंचाई, बदलते हवामान आणि उत्पादनातील घट या तिहेरी संकटात सापडलेल्या सेनगावच्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना सध्या दिलासा देणारे कोणतेही चित्र दिसत नाही. शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन मदत व योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

कोरचीतील धान पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्र्यांकडे केली.

Sep 26, 2026