सायखेडा शेतकरी आत्महत्या 

सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

Saykheda Farmer Suicide: तालुक्यातील सायखेडा येथे शेती नापिकी झाल्याच्या कारणातून ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील लोखंडी पाइपाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

सायखेडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे आत्महत्या 

Saykheda Farmer Suicide

मंगरूळपीर (Saykheda Farmer Suicide) : तालुक्यातील सायखेडा येथे शेती नापिकी झाल्याच्या कारणातून ५८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरातील लोखंडी पाइपाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  अशोक बोबरा जाधव (वय ५८, रा. सायखेडा, ता. मंगरूळपीर) असे मृताचे नाव आहे. , २७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान जाधव यांनी राहत्या घराच्या टीनाच्या आडव्या लोखंडी पाइपाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय, मंगरूळपीर येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

शेतीने साथ न दिल्याने तसेच संपूर्ण शेती नापिकी झाल्याच्या कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या मुलाने दिलेल्या जबानी अहवालात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मृतकाचा मुलगा श्रावण अशोक जाधव यांनी दिलेल्या अहवालावरून मंगरूळपीर पोलिस ठाण्यात मर्ग क्रमांक ४८/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल रन्नू रायलीवाले करीत आहे  (श. प्र)

टैग्स: Saykheda Farmer Suicide