Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > शेती

रिसोड बाजार समिती

रिसोड बाजार समितीत हळदीच्या भावात १००० रुपयांची घसरण; संतप्त शेतकऱ्यांनी पाडली हर्राशी बंद!

Risod Bazar Samiti: कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांचा तीव्र रोष. हळदीच्या भावात तब्बल १,००० रुपयांची मोठी घसरण झाल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट हर्राशी (लिलाव) बंद


रिसोड बाजार समितीत हळदीच्या भावात १००० रुपयांची घसरण संतप्त शेतकऱ्यांनी पाडली हर्राशी बंद

Risod Bazar Samiti |

रिसोड (Risod Bazar Samiti ) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांचा तीव्र रोष पाहायला मिळाला. आदल्या दिवसाच्या तुलनेत हळदीच्या भावात तब्बल १,००० रुपयांची मोठी घसरण झाल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट हर्राशी (लिलाव) बंद पाडली. या प्रकारामुळे बाजार समिती परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी बाजार समितीत आलेल्या हळदीचा लिलाव वेळेत पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल सांभाळत संपूर्ण रात्र बाजार समितीच्या उघड्या ओट्यावर काढावी लागली. त्यानंतर आज, शुक्रवार १७ जुलै रोजी सकाळी उर्वरित हळदीचा लिलाव पुन्हा सुरू करण्यात आला.
​मात्र, दुपारच्या सुमारास शेतकऱ्यांच्या लक्षात आले की, गुरुवारी झालेल्या लिलावाच्या तुलनेत आजच्या हळदीला तब्बल १,००० रुपये प्रति क्विंटल कमी भाव दिला जात आहे. व्यापाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

प्रशासन बेपत्ता; शेतकऱ्यांचा वाली कोण?

​भावातील ही उघड तफावत पाहून शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी एकत्रित येत लिलाव बंद पाडला. बाजार समिती, शासन आणि प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, आंदोलन सुरू होऊन बराच वेळ झाला तरी बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळ किंवा प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी फिरकला नाही. "रिसोड बाजार समितीत (Risod Bazar Samiti) शेतकऱ्यांचा वाली कोणीच उरलेला नाही," असा संतप्त आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.

पोलिसांचा हस्तक्षेप
​शेतकऱ्यांचा वाढता उद्रेक आणि प्रशासकीय अनास्थेमुळे बाजार समितीतील वातावरण अधिकच तापले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून अखेर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली. ​रात्रभर हालअपेष्टा सहन करूनही हक्काच्या पिकाला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, हळदीला योग्य व न्याय्य भाव मिळेपर्यंत लिलाव सुरळीत होऊ न देण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.