Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > शेती

परभणी शेतकरी आत्महत्या

परभणीत किटकनाशकाची विषबाधा; शेतकर्‍याचा मृत्यू

Parbhani Farmer Suicides: बोरी येथील किटकनाशकाची फवारणी केल्यानंतर मळमळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शेतकर्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


परभणीत किटकनाशकाची विषबाधा शेतकर्‍याचा मृत्यू

Parbhani Farmer Suicides |

 

मयत शेतकरी जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील रहिवाशी

परभणी (Parbhani Farmer Suicides) : बोरी येथील किटकनाशकाची फवारणी केल्यानंतर मळमळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शेतकर्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. विषबाधा झाल्याने शेतकरी मयत झाला. ही घटना २२ जुलै रोजी घडली. मयत शेतकरी जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील रहिवाशी आहे. सदर प्रकरणी २३ जुलैला बोरी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

ओमकार जगन्नाथ राऊत यांनी खबर दिली आहे. जगन्नाथ बालासाहेब राऊत वय ५० वर्ष, असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. सदर शेतकर्‍याने दिवसभर शेतात किटकनाशक औषधाची फवारणी केली. रात्री शेतकर्‍याला मळमळ होऊन चक्कर येऊन उलट्या झाल्या. सदर शेतकर्‍यास परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान शेतकर्‍याचा मृत्यू झाला. विषबाधेने शेतकरी मयत झाल्यची बोरी पोलिसात देण्यात आली आहे. तपास पोह. अबुज करत आहेत.

शिक्षणाच्या तणावात विद्यार्थ्याची आत्महत्या 
परभणी : अभियांत्रिकी शिक्षणाच्या तणावात येऊन रेल्वे समोर उडी घेतल्याने जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना २३ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास सेलू येथे घडली. राजू लोखंडे यांनी खबर दिली आहे. धम्मदीप लोखंडे वय २० वर्ष, असे मयत तरुणाचे नाव आहे. तपास पोह. राठोड करत आहेत.