हिंगोली पीकविमा

हिंगोली जिल्ह्यात १६ हजार शेतकर्‍यांनी भरला पीकविमा

Hingoli Pik Vima: महाराष्ट्रातील हिंगोलील शेतकर्यांनी प्रधानमंत्री फसलविमा योजनेत भाग घेतले. यातून सोयाबीन, कपास, तूर, मूग आणि उडद या पिकांवर ₹२.१७ कोटी वीमा भरला

हिंगोली जिल्ह्यात १६ हजार शेतकर्‍यांनी भरला पीकविमा

Hingoli Pik Vima

हिंगोली (Hingoli Pik Vima) : खरिपासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेला १ जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील  १४ जुलैपर्यंत १६ हजार २९९ शेतकर्‍यांनी पीकविमा काढून पिके संरक्षित केली आहेत. जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडिद या पिकांचा विमा योजनेत समावेश आहे.आतापर्यंत शेतकर्‍यांनी १८ हजार ४२० हेक्टरवरील पिकांसाठी स्वहिस्याचा २ कोटी १७ लाख १६ हजार रुपये विमा हप्ता भरुन ११४ कोटी ९ लाख ८६ हजार रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे.विमा काढण्याची ३१ जुलै अंतिम मुदत आहे.

जिल्ह्यातील ४० मंडळातील १६ हजार २९९ शेतकर्‍यांनी २८ हजार ५७७ विमा अर्ज दाखल केले असून. यात काही शेतकर्‍यांनी सीएससी सेंटर व बँकेतून विमा भरला आहे.