धानाचे चुकारे-बोनस

धानाचे चुकारे व बोनससाठी काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Paddy Payments-Bonus: कोरची तालुका शेतकऱ्यांना आर्थिक संकटात असल्यामुळे धानाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना निवेदन

धानाचे चुकारे व बोनससाठी काँग्रेसचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Paddy Payments-Bonus

कोरची (Paddy Payments-Bonus) : कोरची तालुका हा अतिसंवेदनशील आदिवासीबहुल क्षेत्र असून येथील नागरिकांचे मुख्य उपजीविकेचे साधन भातशेती आहे. मात्र खरीप हंगाम 2025-26 मधील धान विक्रीचे चुकारे अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करावा तसेच रब्बी हंगाम 2026 च्या ऑनलाईन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, या मागण्यांसाठी कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार कोरची यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, धानाचे चुकारे (Paddy Payments-Bonus) प्रलंबित असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज भरणेही शेतकऱ्यांना कठीण झाले असून आगामी हंगामासाठी शेतीचे नियोजन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अदा करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करावा व रब्बी हंगाम 2026 साठी सुरू असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. अन्यथा कोरची काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष रामसुराम काटेंगे, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रविकुमार नंदेश्वर, मदन हिडामी, संपत धूर्वे, मेहतरू घाटघूमर, बस्तर होळी, राधेश्याम दरवडे, चमरू कल्लो, राजाराम नैताम, पुनाराम सोनवाणी, भिकम फुलकुवर, हेमकृष्ण सुवा, रमेश होळी, बाबूलाल शेंडे यांच्यासह अनेक शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026
‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार; भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी अटकेत

फलटणमध्ये भूत काढण्याच्या बहाण्याने अघोरी विधी करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. सौरभ नाना मदने याला अटक झाली असून POCSO अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Oct 07, 2026