शेत रस्ता तंटे

लातूरमध्ये पोलिसांनी मिटविले शेत रस्त्याचे ४९ तंटे!

Latur Police: लातूरमध्ये पोलिसांनी 'पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर' उपक्रमांतर्गत ४९ शेत रस्त्याचे वाद मिटविले, सामाजिक सलोखा व कायदेशीर बाबींचा विचार करून.

लातूरमध्ये पोलिसांनी मिटविले शेत रस्त्याचे ४९ तंटे!

Latur Police

लातूर (Latur Police) : 'पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर' या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पोलिसांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन आतापर्यंत जिल्ह्यात ४९ तंटे मिटवून निकाली काढले आहेत. रेणापूर पोलीस ठाणे (Latur Police) हद्दीतील नेहरू नगर शिवारामध्ये अर्जदार सोमनाथ रमेश भोसले यांनी दिनांक १०/०२/२०२६ रोजी शेती रस्त्याच्या वादासंदर्भात तक्रार (एनसी क्र. ८४/२६) दाखल केली होती.

सदर वाद हा अर्जदार व गैरअर्जदार यांच्यात मागील दोन वर्षांपासून सुरू होता. या कालावधीत परस्परांविरुद्ध ४ वेळा एनसी दाखल झाल्या होत्या. शेतात जाण्यासाठी १० फूट रुंदीचा रस्ता देण्याच्या मुद्द्यावरून वारंवार वाद, भांडणे व पोलीस तक्रारी होत होत्या; मात्र कायमस्वरूपी तोडगा निघत नव्हता. या (Latur Police) उपक्रमांतर्गत पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांनी स्टाफसह प्रत्यक्ष शेतात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. गावातील प्रतिष्ठित नागरिक व दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून सखोल चर्चा करण्यात आली. वादाचे मूळ कारण समजून घेऊन, सामाजिक सलोखा जपण्याच्या दृष्टीने व कायदेशीर बाबींचा विचार करून दोन्ही पक्षांची समजूत काढण्यात आली. परिणामी, दोन्ही पक्षांच्या संमतीने सामोपचाराने वाद कायमचा मिटविण्यात आला.

मुरुड पोलीस ठाणे (Latur Police) हद्दीतील भोसा येथे शंकर रंगराव खोसे, भीमराव रंगराव खोसे व लक्ष्मण व्यंकट खोसे यांच्यात ८ ते १० वर्षांपासून शेत रस्त्याचा वाद सुरू होता.या वादाच्या अनुषंगाने यापूर्वी न्यायालयीन प्रक्रिया, तहसीलदार स्तरावरील सुनावणी, पोलीस ठाण्यात तक्रारी तसेच उपोषण व आत्मदहनाचे निवेदन देण्यात आले होते. तरीही वाद निकाली निघत नव्हता. दि. २०/०२/२०२६ रोजी तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक उजगरे, पोलीस व महसूल कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्यात आली. सुमारे ५ तास सखोल चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत रस्ता व नाली तयार करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.  

रेणापूर व मुरुड पोलीस ठाण्याच्या या दोन प्रकरणासह या मोहिमेदरम्यान अवघ्या पाच दिवसांत ४९ जमीन व शेती वादांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आल्याचा दावा पोलीस प्रशासनाने एका प्रसिद्ध पत्रकार केला आहे.

नागरिकांना आवाहन
जमीन व शेतीसंदर्भातील वाद असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित (Latur Police) पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा लाभ घ्यावा व सामंजस्याच्या माध्यमातून वाद मिटविण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन लातूर पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026