शेतकरी कर्जमुक्ती योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कमच अंतिम राहणार 

Farmer Loan Waiver Scheme: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत व्यापारी बँकांच्या एनपीए खात्यांबाबत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत पोर्टलवरील रक्कमच अंतिम राहणार 

Farmer Loan Waiver Scheme

 

सहकार आयुक्त दीपक तावरे यांचे स्पष्टीकरण

हिंगोली (Farmer Loan Waiver Scheme) : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत व्यापारी बँकांच्या एनपीए खात्यांबाबत गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि पोर्टलवरील रकमेत फरक दिसून येत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य यांनी आज सर्व जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्य शासनाने 2 जून 2026 च्या शासन निर्णयानुसार ही योजना जाहीर केली होती. या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी 31 लाख 97 हजार कर्जखात्यांची माहिती सादर केली होती. त्यापैकी 25 जुलै 2026 रोजी 16 लाख 16 हजार कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची 7 लाख 3 हजार आणि व्यापारी बँकांची 9 लाख 13 हजार खाती आहेत.

सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावपातळीवर प्रसिद्ध झालेल्या यादीतील थकबाकी आणि पोर्टलवरील थकबाकी यामध्ये फरक असल्यास पोर्टलवरील रक्कमच ग्राह्य धरण्यात येईल. पोर्टलवरील थकबाकीची रक्कम 31 मार्च 2026 रोजीची आहे. शासनाने 1 जुलै 2026 रोजी सर्व बँकांना 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज न आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 

आधार प्रमाणीकरण यशस्वी झाल्यानंतर शेतकऱ्याला पावती देण्यात येईल. त्यात (Farmer Loan Waiver Scheme) कर्जमुक्तीची रक्कम नमूद केलेली असेल. आधार प्रमाणीकरणानंतर 31 मार्च 2026 वरील कर्जबाकीची लाभाची रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यानंतर बँकामार्फत कर्ज बेबाकीचे प्रमाणपत्र संबंधित शेतकऱ्याला दिले जाईल. कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकेच्या शाखेत आणि सेवा संस्थांमध्ये लावण्यात येतील. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना संबंधित बँकेमार्फत खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

पोर्टलवरील रक्कम किंवा इतर तपशीलाबाबत शेतकऱ्यांची काही तक्रार असल्यास त्यांनी पोर्टलवर Grievance नोंदवावी. त्याचा निपटारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केला जाईल. सहकार आयुक्तांनी हे स्पष्टीकरण सर्व शेतकरी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित सामग्री

कर्जमाफीचा एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये; आमदार श्वेता महाले पाटील यांचे निर्देश

कर्जमाफीचा एकही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहता कामा नये; आमदार श्वेता महाले पाटील यांचे निर्देश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींची आमदार श्वेता महाले पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे.

Sep 05, 2026
फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा; पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांना लाभ

फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा; पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांना लाभ

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला वेग आला.

Aug 07, 2026
पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

पीडीसी बँकेच्या अध्यक्षपदी रामप्रसाद कदम बोर्डीकर आणि उपाध्यक्षपदी भैय्या पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड

PDC Bank: सहकारी बँकेतच्या उपाध्यक्षपदी गेल्या भव्यांवर नाविने अच्याः रामप्रसाद कदम आणि उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा पाटील राझेश यांची बिनविरोध निवड झाली.

Aug 03, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण सुरू

राज्य शासनाने दि. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 जाहीर केली आहे.

Jul 30, 2026
निवडणूकीत आ.राजू नवघरे, राजामती मुटकुळे व अभय पाटील सावंत विजयी

निवडणूकीत आ.राजू नवघरे, राजामती मुटकुळे व अभय पाटील सावंत विजयी

Parbhani Bank Election: वसमत मधून आमदार राजूभैय्या नवघरे, हिंगोलीतून सौ. राजामती शिवाजीराव मुटकुळे आणि कळमनुरीतून अभय पाटील सावंत या तिन्ही उमेदवारांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला

Jul 20, 2026