Revolutionary Farmers' Organization: बुलढाण्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आंदोलन मागून जिल्हाधिकाऱ्याने 600 टन DAP च्या बफर साठा खुला करण्याचे आदेश जाहीर केले. विशिष्ट प्रमाणात खत उपलब्ध
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश, जिल्ह्यात खत पुरवठा सुरू
चिखली (Revolutionary Farmers' Organization) : खरीप हंगामाच्या तोंडावर DAP खताच्या तीव्र टंचाईमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, विनायक सरनाईक डॉ ज्ञानेश्वर टाले यांनी शेतकऱ्यांसमवेत केलेल्या आक्रमक आंदोलनाची दखल घेत, जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांकडे DAP खताचा पुरवठा सुरू झाला असून, 600 मेट्रिक टन बफर साठा विक्रीसाठी खुला करण्याचे आदे जिल्हाधिकारी यांनी दिले होता तर दि15जुन रोजी बफर साठा खुला करण्यात आला आहे.
मागील आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली,मेहकर,व संग्रामपूर तालुक्यात DAP खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. पेरणीच्या तोंडावर खत मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत होते.खताचे दर गगणाला भिडले असून अचानक खतांचे दर वाढत असल्याने शेतकरी जास्तीचे दरात DAP ऐवजी दुसरे रासायनिक खत खरेदी करीत आहेत.त्याचप्रमाणे कमी दरातील खत जास्तीच्या दराने विक्री केल्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत.
याच (Revolutionary Farmers' Organization) पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर,यांच्या नेतृत्वाखाली विनायक सरनाईक, डॉ ज्ञानेश्वर टाले यांच्यासमवेत चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विकास अधिकारी यांना घेराव घातला होता याबाबत रविकांत तुपकर यांनी आंदोलनात तोडगा काढण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री देवरे यांना भ्रमणध्वनी व्दारे चर्चा केली होती जिल्हा कृषी कार्यालयात सुद्धा शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढून आंदोलन केले होते.खत नाही तर पेरणी करायची कशी? असा सवाल उपस्थित करीत प्रशासनाला विनायक सरनाईक यांनी 12/06/2026रोजी डी ए पी खता बाबत निवेदन देखील देण्यात आले होते.
या (Revolutionary Farmers' Organization) आंदोलनाची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दि.१५जुन २०२६ रोजी आदेश काढून संरक्षित DAP चा साठा खुला करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कृषी विभाग,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांनी डी ए पी संरक्षीत साठा खुला करण्याच्या सुचना तालुका कृषी अधिकारी व कृषी विक्रेत्यांना दिल्या आहेत.
600 मे.टन बफर स्टॉक खुला, चिखलीला 75 मे.टन
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने काढलेल्या आदेशानुसार, खरीप हंगाम 2026 साठी विदर्भ कॉप मार्केटिंग फेडरेशन, मलकापूर आणि महा. कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्याकडे संरक्षित असलेला 600 मेट्रिक टन DAP चा बफर साठा विक्रीसाठी खुला करण्यात आला आहे.
या आदेशानुसार तालुकानिहाय DAP वितरण असे असेल:
- चिखली: 75 मे.टन
- बुलढाणा: 40 मे.टन
- मलकापूर: 40 मे.टन
- मोताळा, नांदुरा, खामगाव: प्रत्येकी 40 मे.टन
- जळगाव जामोद: 35 मे.टन
- शेगाव, संग्रामपूर: प्रत्येकी 30 मे.टन
- इतर तालुके: मेहकर 70, लोणार 50, सिं.राजा 60, दे.राजा 40 मे.टन
शेतकऱ्यांना दिलासा, पण पुरवठा सुरळीत ठेवा - संघटनेची मागणी
आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली आणि बफर स्टॉक खुला झाला, याचे आम्ही स्वागत करतो. चिखली तालुक्याला 75 मे.टन DAP मिळाल्याने येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांकडे खत उपलब्ध होत आहे, अशी प्रतिक्रिया क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, "हा फक्त तात्पुरता उपाय आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्याला हजारो टन DAP ची गरज आहे. त्यामुळे शासनाने नियमित पुरवठा सुरळीत ठेवावा. काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी व प्रत्येक शेतकऱ्याला आधार कार्डवर रास्त भावात खत मिळेल याची हमी द्यावी, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा विनायक सरनाईक यांनी दिला आहे.
कृषी विभागाच्या नियंत्रणात होणार खत विक्री...
दरम्यान, कृषी विभागाने सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांना हा (Revolutionary Farmers' Organization) साठा तातडीने वितरित करण्याच्या सूचना दिल्या असून, कृषी विभागाने वितरणावर नियंत्रण ठेवण्याचे देखील या आदेशत नमुद आहे. विशेष यामधील जास्तीत जास्त डी ए पी खत हे ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.यामधे चिखली तालुक्यातील बालाजी शेतकरी कृषी केंद्र चिखली १५ मे.टन,आर्यन ड्रेडर्स मेरा खु १५मे टन,ओम कृषी केंद्र अमडापुर १५ मे.टन,राज कृषी केंद्र इसोली १५ मे.टन,तिरुपती कृषी केंद्र उदय नगर १५ मे टन एकून ७५ मे.टन खत उपलब्ध करून देण्यात आले आहे.