Spurious soybean seed case: स्थानीय शेतकर्या ने यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. (लक्ख्मी टॉकीज) विरुद्ध अप्रामाणित सोयाबीन बियाण्यांचा दावेवरून गुन्हा दाखल करावा लागला.
खामगाव (Spurious soybean seed case) : पंचायत समितीचे कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांनी काल १४ जुलै २६ रोजी शहर पोस्टेला फिर्याद दिली. त्यामध्ये नमुद केले आहे की, तालुक्यातील अकोली येथील शेतकरी सुभाष किसन मुजुमले यांनी सोयाबीन बियाणे उगवणीबाबत यशोदा हायब्रीड सिड्स प्रा.ली. (लक्ष्मी टॉकीज शेजारी हिंगणघाट जि. वर्धा) यांच्या विरुध्द तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने सदर बियाण्याचे नमुने काढुन प्रयोगशाळा बीज प्रमाणीकरण अकोला येथे पाठविले असता ५ नमुन्यांचे अप्रमाणीत अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे प्राप्त झाले.
सदर बियाणे हे सत्यता दर्शक बियाणे या प्रकारात मोडतात परंतु सदरच्या बियाण्यांची उत्पादन प्रक्रिया, पॅकींग व सिलिंग या बाबीवर कोठेही प्रमाणीकरण यंत्रणा किंवा शासकीय प्रमाणीकरण संस्था यांचा हस्तक्षेप नसतो. या सर्व प्रक्रीयेची सर्वस्वी जबाबदारी बियाणे उत्पादक कंपनीची असते. त्यामुळे उपरोक्त कंपनीने सदर सोयाबीन बियाणे बनवुन शेतकऱ्यांची दिशाभुल व फसवणुक केली आहे. फिर्यादीवरून शहर पोस्टेमध्ये उपरोक्त कंपनी विरूध्द जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ कलम ३ व ७, बियाणे कायदा १९६६ कलम ६, ७, १९ व २१, बियाणे नियम १९६८ कलम १० व २३ व भान्यासं कलम ३१८ (४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास एपीआय राहाटे करीत आहेत.