Ujjain Shahi Masjid

उज्जैनच्या शाही मशिदीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

उज्जैनच्या शाही मशिदीचा भाग हटवण्यावरून आंदोलन, दगडफेक आणि तणाव. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा चर्चेत.

उज्जैनच्या शाही मशिदीवरून तणाव; दगडफेकीनंतर पोलिसांचा अश्रुधुराचा वापर

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा; मशिदीचा भाग हटवण्यावरून मुस्लिम समाजात दोन मतप्रवाह

उज्जैनच्या अब्दालपुरा परिसरातील शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या प्रशासनाच्या कारवाईवरून तणाव निर्माण झाला आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक नागरिकांसह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मशिदीबाहेर एकत्र येत आंदोलन करत आहेत. दरम्यान, या मुद्द्यावर मुस्लिम समाजातही दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आले असून, एका गटाने संबंधित भाग स्वतःहून हटवण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसऱ्या गटाने कारवाईला विरोध केला आहे.

रविवारी रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबी आणि पोकलँड मशिनरी घटनास्थळी पोहोचल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. यानंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासन आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी परिसरात सुमारे 2 हजार पोलीस जवान तैनात करण्यात आले आहेत.

शाही मशिदीच्या 500 मीटर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, या भागातील वाहतूक तसेच नागरिकांची ये-जा प्रतिबंधित करण्यात आली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांनीही सहभाग घेतल्याचे दिसून आले.

पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ तणाव कमी झाला. मात्र, सोमवारच्या दिवशीही परिसरात आंदोलन सुरूच राहिले. यावेळी संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचा मुद्दा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कंठाल चौक ते गोपाल मंदिर या सुमारे 900 मीटर अंतराच्या रस्त्याचे 15 मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याची योजना आहे. या प्रस्तावित रुंदीकरणाच्या मार्गात सात धार्मिक स्थळे येत होती. त्यापैकी बहुतांश धार्मिक स्थळे संबंधितांच्या सहमतीने हटवण्यात आली आहेत.

मात्र, खडे हनुमान मंदिरापासून गोपाल मंदिरापर्यंतच्या मार्गावरील एका मस्जिदीसह खडे हनुमान मंदिर आणि शाही मशिदीचा मुद्दा कायम राहिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या कारवाईवरून सध्या स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

मुंबईच्या परळ-चिंचपोकळीत मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद; धक्काबुक्कीनंतर काही ठिकाणी दगडफेक, पोलिसांचा बंदोबस्त

मुंबईच्या परळ-चिंचपोकळीत मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद; धक्काबुक्कीनंतर काही ठिकाणी दगडफेक, पोलिसांचा बंदोबस्त

परळ-चिंचपोकळी परिसरात मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Aug 27, 2026
कळमनुरीतील भाजीमंडीजवळ पुलाच्या पाईपमध्ये कचरा अडकून घाणेरडे पाणी रस्त्यावर

कळमनुरीतील भाजीमंडीजवळ पुलाच्या पाईपमध्ये कचरा अडकून घाणेरडे पाणी रस्त्यावर

कळमनुरी नगरपालिकेमार्फत साईनगर ते चिंचाळेश्वर महादेव मंदिर या मुख्य मार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.

Jul 30, 2026
दारूबंदी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; तीन पोलिस जखमी

दारूबंदी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; तीन पोलिस जखमी

वायफड बसथांबा ते पारधी बेडा परिसरात दारूबंदी मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर जमावाने हल्ला करून दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली.

Jul 14, 2026
परभणीत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

परभणीत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

Parbhani police Stone-pelting: मध्यरात्री परभणीत साखला प्लॉट येथे पोलिस पथक आरोपींना शोधासाठी गेल्यानंतर बेकायदेशीर जमावाने दगडफेक केला. पोउपनि नारायण दुधाटे यांच्यावर गुन्हा

Jun 17, 2026
घोट–रेगडी मार्गाच्या रुंदीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष; नागरिकांची तीव्र मागणी

घोट–रेगडी मार्गाच्या रुंदीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष; नागरिकांची तीव्र मागणी

Ghot-Regdi Route: घोट-रेगडी मार्गाच्या रुंदीकरणासाठी व त्याचे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्याची तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. या मार्गामुळे दोन्ही राज्यांतील संपर्क सुधारेल.

Apr 26, 2026