Breaking News
  • दिवे घाट येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग साठी रस्ता बंद
  • महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्याला आग, प्रवाशांमध्ये घबराट
  • विदर्भातील २६ मोठ्या धरणांमध्ये सरासरी ४९.७६ टक्के जलसाठा
  • पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद
  • अमरावती विमानतळावर 'नाईट लँडिंग' पुन्हा रखडले!
  • नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी MIDC परिसरात कंपनीत आग
  • शहादा शिरपूर रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा...
  • साई नगरीत तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
  • सोलापूर- मुळेगाव गोळीबारातील मुख्य सूत्रधाराला केले जेरबंद

होम > देश

PUC Certificate

BS6 वाहनधारकांना मोठा दिलासा? PUC प्रमाणपत्राच्या नियमांत मोठा बदल प्रस्तावित

देशातील लाखो वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरू शकणारा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) समोर ठेवला आहे.


bs6 वाहनधारकांना मोठा दिलासा puc प्रमाणपत्राच्या नियमांत मोठा बदल प्रस्तावित

PUC Certificate |

६ वर्षांपर्यंतच्या BS6 खासगी वाहनांसाठी PUC वैधता १ वर्षाऐवजी ३ वर्षे करण्याचा प्रस्ताव; मसुदा अधिसूचनेवर नागरिकांकडून सूचना मागवल्या

नवी दिल्ली: देशातील लाखो वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरू शकणारा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) समोर ठेवला आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) संदर्भातील विद्यमान नियमांमध्ये बदल करण्यासाठी मंत्रालयाने मसुदा अधिसूचना जारी केली असून, ६ वर्षांपर्यंत जुन्या BS6 खासगी वाहनांच्या PUC प्रमाणपत्राची वैधता १ वर्षावरून थेट ३ वर्षे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास BS6 खासगी वाहनधारकांना दरवर्षी PUC तपासणी करून प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याची गरज राहणार नाही. परिणामी वाहनधारकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होण्याची शक्यता आहे. प्रस्तावानुसार, ६ वर्षांपर्यंतच्या BS6 वाहनांची प्रदूषण तपासणी दर तीन वर्षांनी एकदाच करावी लागेल.

मसुद्यात जुन्या वाहनांसाठी मात्र अधिक कडक नियम सुचविण्यात आले आहेत. ६ ते १० वर्षे जुन्या BS6 वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी PUC चाचणी बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय BS4 वाहनांचे PUC प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी, तर BS1, BS2 आणि BS3 वाहनांची प्रदूषण तपासणी दर तीन महिन्यांनी करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

BS म्हणजे भारत स्टेज (Bharat Stage) उत्सर्जन मानके. वाहनांमधून होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ही मानके लागू करण्यात आली आहेत. भारतात एप्रिल २०२० पासून BS6 उत्सर्जन मानके लागू झाली. BS4 नंतर देशाने थेट BS6 मानकांचा अवलंब केला. BS6 इंजिनमध्ये कमी सल्फरयुक्त इंधनाचा वापर होत असल्याने ही वाहने तुलनेने कमी प्रदूषण करतात.

मात्र, हे बदल अद्याप लागू झालेले नाहीत. सरकारने सध्या केवळ मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यावर नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास देशभरातील लाखो BS6 वाहनधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Related to this topic: