Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > देश

Meerut Murder Case

मेरठमध्ये ७ वर्षीय अंगदवीरच्या हत्येचा उलगडा; आईसोबतच्या प्रेमसंबंधातून आरोपीने रचला कट

उत्तर प्रदेशातील मेरठ येथे सात वर्षीय अंगदवीरच्या हत्येप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.


मेरठमध्ये ७ वर्षीय अंगदवीरच्या हत्येचा उलगडा आईसोबतच्या प्रेमसंबंधातून आरोपीने रचला कट

Meerut Murder Case |

घड्याळाचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले, २४ किमी दूर नेऊन निर्घृण हत्या; आरोपी अर्पित पराशरची पोलिसांसमोर कबुली

मेरठ (Meerut Murder Case) : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे सात वर्षीय अंगदवीरच्या हत्येप्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अर्पित पराशर याने पोलिस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्या कशी केली याचा संपूर्ण घटनाक्रमही सांगितला आहे. प्राथमिक तपासानुसार, मुलाच्या आईसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अर्पित पराशर याने अंगदवीरला घड्याळ घेऊन देण्याचे आमिष दाखवत आपल्या कारमध्ये बसवले. त्यानंतर त्याला मेरठपासून सुमारे २४ किलोमीटर अंतरावरील हस्तिनापूर परिसरात नेले. भद्रकाली मंदिराजवळील जंगलात नेऊन त्याने मुलाची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

पगडीने तोंड दाबले, हाताची नस कापून गळा आवळला

चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, मुलाचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्याने प्रथम पगडीने त्याचे तोंड दाबले. त्यानंतर चाकूने त्याच्या हाताची नस कापली आणि शेवटी गळा आवळून त्याची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर मृतदेह जवळील शेतात फेकून दिल्याचेही त्याने कबूल केले. आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमसंबंधातून रचला हत्येचा कट

या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी अर्पित पराशरला अटक केली. तो एका बँकेत व्यवस्थापक (मॅनेजर) म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, अंगदवीरची आई गुरप्रीत कौर हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध होते आणि तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती.

आरोपीच्या म्हणण्यानुसार, अंगदवीर त्यांच्या नात्यात अडथळा ठरत होता. रविवारी मुलाने त्याला आपल्या आईसोबत पाहिले होते. ही बाब तो कुटुंबीयांना सांगेल, या भीतीतून त्याने अंगदवीरच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली आहे.

वडील दुबईत, आई माहेरी राहत होती

अंगदवीरचे वडील गुरसेवक हे दुबईमध्ये नोकरी करतात. त्यांचे एक घर पंजाबमधील पटियाला येथे, तर दुसरे बिजनौर जिल्ह्यातील नजीमाबाद येथे आहे. अंगदवीरची आई गुरप्रीत कौर ही पूर्वी गावातील एका खासगी शाळेत शिक्षिका होती. मात्र, सुमारे दीड वर्षांपूर्वी तिने नोकरी सोडली आणि नजीमाबाद येथील माहेरी राहू लागली.

याच काळात तिची आरोपी अर्पित पराशर याच्याशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे तपासात समोर आले आहे. पती दुबईत असल्यामुळे अर्पितची गुरप्रीत कौरच्या घरी नियमित ये-जा असल्याची माहितीही पोलिस तपासात उघड झाली आहे.

सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: