धवलेश्वरम (Kandula Jesi) : आंध्रप्रदेशमधील धवलेश्वरम येथील 'जेसी गर्ल्स हायस्कूल'मधील दहावीचे विद्यार्थी मे 2025 मध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीत मग्न होते. मात्र, एक चौदा वर्षांची मुलगी अशी होती जी पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापलीकडे एका विशाल स्वप्न पाहात होती. विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थिनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय 'कंडुला जेसी'ची (Kandula Jesi) देशभर चर्चा होतेय,जिची 'शक्तीसॅट' या मोहिमेसाठी निवड झाली आहे. ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय केवळ मुलींचा सहभाग असलेली चांद्र मोहीम आहे.
108 देशांमधील सुमारे 12,000 अर्जदारांमधून निवडल्या गेलेल्या 20 भारतीय विद्यार्थ्यांपैकी कंडुला जेसी (Kandula Jesi) ही एक आहे आणि या टीममध्ये आंध्र प्रदेशातून सहभागी झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे. या मोहिमेअंतर्गत, विद्यार्थ्यांनी विकसित केलेला ल्युनर क्यूबसॅट 11 ऑक्टोबर रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केला जाणार आहे. ही जगातील अशी पहिलीच मोहीम आहे जिथे केवळ विद्यार्थिनी एकत्र येऊन चंद्र मोहिमेसाठी क्यूबसॅट तयार करत आहेत. मोहिमेचा एक भाग म्हणून, जेसीला सॅटेलाइट सिस्टिम्स (उपग्रह प्रणाली), अंतराळ तंत्रज्ञान आणि इतर तांत्रिक विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या कामगिरीमुळे केवळ तिच्या कुटुंबाचा आणि शाळेचाच गौरव झाला नाही, तर सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्येही एक नवी आशा निर्माण झाली आहे.
कंडुलाचे वडील काय करतात?
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील धवलेश्वरम येथील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय कंडुला जेसीची (Kandula Jesi) ही कथा एका छोट्या गावातून अंतराळ विज्ञानाच्या भव्य मंचापर्यंत पोहोचण्याची आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या जेसीचे वडील सुतारकाम करतात. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे, तिच्या पालकांनी तिला खाजगी शाळेतून सरकारी शाळेत हलवले. सध्या जेसी धवलेश्वरम येथील जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीची विद्यार्थिनी आहे.
कंडुला जेसी
सरकारी शाळेत शिकणाऱ्या लेकीची 14 व्या वर्षीच अंतराळभरारी!
Kandula Jesi: विज्ञानाच्या क्षेत्रात काहीतरी अद्वितीय साध्य करण्याची जिद्द आणि कुतूहल यामुळे सरकारी शाळेतील या सामान्य विद्यार्थिनीची चर्चा आज देशभर होत आहे. होय 'कंडुला जेसी'ची देशभर चर्चा..
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Kandula Jesi