Delhi Visit

शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा; पंतप्रधान मोदींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

शिवसेना प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा; पंतप्रधान मोदींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा

Delhi Visit

सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची दिल्ली भेट; महाराष्ट्रातील घडामोडी, विकासकामे आणि मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दौरा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. ठाकरे गटाकडून न्यायालयात जोरदार बाजू मांडली जात असताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे गावाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. मात्र नियोजित कार्यक्रम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी दौरा आटोपता घेत थेट दिल्लीकडे प्रस्थान केले. सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेशी संबंधित सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर सुरू असतानाच झालेल्या या दौऱ्यामुळे विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जेन झी (Gen Z) आंदोलनानंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी एनडीएच्या घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करत असून, त्याच अनुषंगाने शिंदे यांना दिल्लीत बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याशिवाय, सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेल्या सुनावणीबाबत, संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारातील खात्यांचे वाटप तसेच विविध विकासकामांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटातील सहा खासदारांनी अलीकडेच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या खासदारांसह शिवसेनेच्या काही खासदारांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्याने या बैठकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांचा आढावा तसेच संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातही नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित सामग्री

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
ओक्लाहोमाच्या जमिनीखालील उल्कागर्तेचा इतिहास बदलला; ४६७ नव्हे, ३७० दशलक्ष वर्षांपूर्वी धडक झाल्याचा नवा शोध

ओक्लाहोमाच्या जमिनीखालील उल्कागर्तेचा इतिहास बदलला; ४६७ नव्हे, ३७० दशलक्ष वर्षांपूर्वी धडक झाल्याचा नवा शोध

ओक्लाहोमातील Ames उल्कागर्तेचे वय नव्या संशोधनाने जवळपास १०० दशलक्ष वर्षांनी बदलले. झिरकॉन क्रिस्टल्सनुसार धडक ३७० दशलक्ष वर्षांपूर्वीची असू शकते.

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

SIRच्या १४ निर्णयांवरून ज्ञानेश कुमार अडचणीत? सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

CEC ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने अंतरिम आदेशास नकार देत निवडणूक आयोग आणि केंद्राला नोटीस बजावली.

Oct 05, 2026
'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

'गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण करा'; बलात्काराच्या वाढत्या घटनांवर सर्वोच्च न्यायालयाचे कठोर निर्देश

दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली. सार्वजनिक ठिकाणे ‘हाय रिस्क झोन’ होऊ नयेत, असे सांगत सुरक्षा ऑडिटचे निर्देश दिले.

Oct 05, 2026