भारतात मोठ्या आंदोलनाची तयारी? अभिजित दीपके यांचा ॲड. असीम सरोदे यांना दूरध्वनी

कॉकरोच जनता पक्ष'चे संस्थापक अभिजित दीपके हे ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार असून, त्यांच्या आगमनापूर्वीच देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

भारतात मोठ्या आंदोलनाची तयारी? अभिजित दीपके यांचा ॲड. असीम सरोदे यांना दूरध्वनी

Delhi Protest

(Delhi Protest) कॉकरोच जनता पक्ष'चे संस्थापक अभिजित दीपके हे ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार असून, त्यांच्या आगमनापूर्वीच देशातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भारतात परतण्यापूर्वी त्यांनी काही महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली असून, त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांचाही समावेश आहे.

ॲड. सरोदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, अभिजित दीपके यांनी अमेरिकेतून त्यांना दूरध्वनी व संदेश पाठवून भारतात परतण्याबाबत चर्चा केली. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी सर्व बाबींचा सखोल विचार करूनच भारतात यावे, असा सल्ला आपण दिल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले.

अभिजित दीपके यांची भूमिका मांडताना सरोदे म्हणाले की, देशातील मुलांच्या समस्या आणि त्यांच्या वेदना मांडण्यासाठी कॉकरोच जनता पक्ष उभा राहिला आहे, असे दीपके यांचे मत आहे. मात्र कोणतेही आंदोलन किंवा जनजागृती करताना प्रक्षोभक भाषणांचा अवलंब न करता महात्मा गांधी यांच्या अहिंसात्मक मार्गाचा स्वीकार करावा, अशी सूचना आपण त्यांना केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दीपके भारतात आल्यानंतर त्यांना मोठा लोकसमर्थन मिळतो की नाही, याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष राहील, असे सरोदे यांनी नमूद केले. थेट अटक करण्याची घाई शासन करणार नाही, असे वाटत असले तरी काही परिस्थितींमध्ये विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

विशेष म्हणजे, केंद्र सरकारने यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत कॉकरोच जनता पक्षाचे 'एक्स'वरील खाते बंद केले होते. या निर्णयाविरोधात दीपके यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने खाते तत्काळ सुरू करण्यास नकार दिला असला तरी केंद्र सरकार आणि 'एक्स' व्यवस्थापनाला नोटिसा बजावून प्रकरण विचाराधीन ठेवले आहे.

सोनम वांगचुक, प्रकाश राज, डॉ. विश्वंभर चौधरी, निखिल वागळे यांच्यासह अनेक मान्यवरांना आगामी आंदोलनासाठी निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे ६ जूननंतरच्या घडामोडींवर देशभराचे लक्ष लागले आहे.

 ६ जूनच्या दिल्लीतील आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा समर्थक सोनम वांगचुक हे ६ जून रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे आंदोलन कॉकरोच जनता पार्टी (CJP) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

जंतर-मंतर आंदोलनात 3 महिला पत्रकारांच्या लैंगिक छळाच्या तक्रारी; क्राइम ब्रांच करणार चौकशी

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनादरम्यान तीन महिला पत्रकारांनी लैंगिक छळाच्या तक्रारी केल्या. दिल्ली पोलिसांनी प्रकरण क्राइम ब्रांचकडे सोपवले.

Oct 04, 2026
CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

CJPच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला पोलिसांचा नकार; अभिजीत दिपकेंचा ‘जेल भरो’चा इशारा

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशात राजकीय वाद सुरू असतानाच आता कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आंदोलनाची घोषणा केली आहे.

Sep 27, 2026
डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

डीजेविरोधातील लढा ते निवडणुकीचे मैदान? विद्यानंद बापट यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा

विद्यानंद बापट पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असीम सरोदेंच्या पोस्टनंतर चर्चेला वेग; मात्र बापटांची अधिकृत उमेदवारी अद्याप जाहीर नाही.

Sep 24, 2026
सोनम वांगचुकांच्या लडाख पदयात्रेत CJPचे प्रमुख नेते गैरहजर

सोनम वांगचुकांच्या लडाख पदयात्रेत CJPचे प्रमुख नेते गैरहजर

लडाखच्या मागण्यांसाठी सोनम वांगचुकांची लेहमध्ये पदयात्रा; CJP नेत्यांची अनुपस्थिती आणि २० जणांवरील गुन्हे मागे घेण्याचा प्रशासनाचा निर्णय चर्चेत.

Sep 24, 2026