Breaking News
  • मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण, संगमनेरमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये 4 गावातील मराठा समाजाचे गावकरी आक्रमक,रास्ता रोको आंदोलन
  • पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
  • आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी
  • मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट, नशिराबादेत चेन्नई सायबर क्राईमची धडक!
  • लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड
  • नंदुरबारमध्ये 93 लाखांचा 186 किलो गांजा जप्त
  • OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत
  • माकडांमुळे शाळा बंद, विद्यार्थी व शिक्षक शाळा सोडून पळाले

होम > देश

बांग्लादेश ऊर्जा संकट

बांग्लादेशात भीषण ऊर्जा संकट; भारताकडे मदतीची हाक

Bangladesh Energy Crisis:


बांग्लादेशात भीषण ऊर्जा संकट भारताकडे मदतीची हाक

Bangladesh Energy Crisis |

ढाका (Bangladesh Energy Crisis) : बांगलादेशात तीव्र वीज आणि ऊर्जा संकट निर्माण झाले असून अनेक भागांत दररोज आठ ते दहा तास वीजकपात होत आहे. वाढत्या संकटामुळे सरकारने वीज बचतीसाठी दुकाने, बाजारपेठा आणि शॉपिंग मॉल रात्री आठपर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याचा परिणाम नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांवर होत आहे.

देशातील विजेची मागणी सुमारे १८ हजार मेगावॅट असताना उपलब्ध पुरवठा १३ हजार मेगावॅटपर्यंतही पोहोचत नसल्याने ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. काही ठिकाणी वीज केंद्रे, ग्रीड आणि कार्यालयांवर तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे (Bangladesh Energy Crisis) वीज यंत्रणांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बांगलादेशच्या ऊर्जा संकटामागे नैसर्गिक वायू आणि इंधनाची कमतरता प्रमुख कारण मानली जात आहे. जुलैमध्ये अमेरिकेच्या एक्सेलरेट एनर्जीच्या एलएनजी टर्मिनलला आग लागल्यानंतर गॅसपुरवठा निम्म्यावर आला. खराब हवामानामुळे एलएनजी वाहून आणणारी जहाजेही वेळेत पोहोचू शकली नाहीत. परिणामी वीज निर्मितीवर परिणाम झाला.

या (Bangladesh Energy Crisis) संकटातून मार्ग काढण्यासाठी बांगलादेशने भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केली आहे. बांगलादेशचे ऊर्जा मंत्री इक्बाल हसन महमूद यांनी भारतीय उच्चायुक्तांकडे ही मागणी मांडली. भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनद्वारे भारत दरवर्षी बांगलादेशला १.८० लाख टन डिझेल पुरवतो. सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा पुरवठा वाढवण्याची विनंती करण्यात आली आहे.