Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > देश

AC चं तापमान कमी म्हणजे बचत जास्त? ही सवय तुमच्या खिशाला बसतेय महागात!

एप्रिलचा शेवट जवळ आला की उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. दुपारच्या वेळी बाहेर पडणं अवघड होतंच, पण घरात बसूनही घाम गळू लागतो.


ac चं तापमान कमी म्हणजे बचत जास्त ही सवय तुमच्या खिशाला बसतेय महागात

Air Conditioner Tips |

AC 18 वर ठेवता? तुमचं वीज बिल का वाढतंय यामागचं खरं कारण समोर!

(Air Conditioner Tips) एप्रिलचा शेवट जवळ आला की उन्हाचा तडाखा जाणवू लागतो. दुपारच्या वेळी बाहेर पडणं अवघड होतंच, पण घरात बसूनही घाम गळू लागतो. अशा परिस्थितीत AC हा अनेकांसाठी दिलासा देणारा पर्याय ठरतो. ऑफिसमधून परतल्यावर किंवा झोपण्यापूर्वी आपण एसी सुरू करून तापमान थेट 18 अंशांवर ठेवतो. आपल्याला वाटतं, कमी तापमान ठेवलं की खोली लवकर थंड होईल. पण प्रत्यक्षात हे गणित थोडं वेगळंच आहे.

महिन्याच्या शेवटी वीज बिल हातात आलं की मात्र धक्का बसतो. “AC वापरला खरा, पण बिल इतकं कसं वाढलं?” असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर AC योग्य तापमानावर वापरला, तर मोठ्या प्रमाणात वीज बचत होऊ शकते.

18 अंश vs 26 अंश – काय फरक?

अनेकांना वाटतं की AC 18 अंशावर ठेवल्यास खोली पटकन थंड होते. पण तांत्रिकदृष्ट्या एसीची कूलिंग प्रक्रिया एकसारखीच असते. तुम्ही 18 अंश सेट करा किंवा 26 अंश, खोली ठराविक तापमानापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ जवळपास समानच असतो. बाहेरचं तापमान 40 अंश असलं तरी 24 ते 26 अंश हे शरीरासाठी आरामदायी मानलं जातं.

कॉम्प्रेसर आणि वीज वापर

AC चं तापमान जितकं कमी ठेवता, तितका त्याचा कॉम्प्रेसर अधिक वेळ चालतो. 18 किंवा 20 अंशांवर AC सेट केल्यास कॉम्प्रेसर सतत काम करत राहतो, त्यामुळे वीज जास्त खर्च होते. उलट, 24 ते 27 अंशांदरम्यान तापमान ठेवल्यास कॉम्प्रेसर कमी वेळ चालतो आणि वीज बचत होते.

थर्मोस्टॅट कसा मदत करतो?

एकदा खोलीतील तापमान ठरलेल्या पातळीवर पोहोचलं की एसीचा कॉम्प्रेसर थांबतो आणि फक्त फॅन चालू राहतो. तापमान पुन्हा वाढलं की कॉम्प्रेसर सुरू होतो. जर तुम्ही एसी 27 अंशांवर वापरला, तर वर्षभरात साधारण 6 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते आणि जवळपास 900–1000 युनिट्स वीजही वाचू शकते.

वीज बिलावर परिणाम करणारे इतर घटक

AC चा वापर किती खर्चिक ठरेल, हे फक्त तापमानावर ठरत नाही. काही महत्त्वाचे घटक असेही आहेत—

  • AC चे स्टार रेटिंग (3 स्टार, 5 स्टार)
  • खोलीचा आकार आणि लोकांची संख्या
  • खिडक्या-दरवाज्यांचे इन्सुलेशन
  • बाहेरील तापमान

आरोग्याचाही विचार गरजेचा

काहीजण AC18 अंशावर ठेवून जाड चादर घेऊन झोपतात. ही सवय वीजेची उधळपट्टी तर करतेच, पण शरीरासाठीही योग्य नाही. बाहेरील उष्णता आणि आतली अतिशय थंड हवा यामुळे शरीराचे संतुलन बिघडू शकते.

AC चा योग्य आणि किफायतशीर वापर करायचा असेल, तर तापमान 24 ते 26 अंशांच्या दरम्यान ठेवणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला पुरेसा थंडावा मिळेल, वीजही वाचेल आणि महिन्याच्या शेवटी बिलाचा ताणही कमी होईल.