खून प्रकरणाने वसमतमध्ये खळबळ; खुनाचे कारण मात्र गुलदस्त्यातच
वसमत (Wasmat murder case) : शहरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या शेजारी असलेल्या पुर्णा प्रकल्प पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह परिसरात वसमत शहरातील ३३ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमाचे नेमके कारण समजू शकले नाही.
वसमत शहरातील सुवर्णकार कॉलनीतील रहिवाशी तरुण अभिजीत रत्नाकर शहाणे (३३) याचा मृतदेह वसमत शहरातील जुनाट पडीत अवस्थेत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाच्या जवळ शुक्रवारी सकाळी मृतदेह आढळला पोलिसांना पाचारण करण्यात आले. वसमत शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वृत्तीची पाहणी केली तपासणी केली असता मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मयत हा वसमत येथील रहिवासी असून अभिजीत शहाणे असे त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. मयत हा वसमत येथील पाटील नगर भागातील एका दुकानात खाजगी नोकर म्हणून काम करत असल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची तसेच मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या चेहर्यावर तसेच शरीरावर दगडाने मारल्याच्या जखमा आहेत. यावरून खून झाले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह वसमत उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या (Wasmat murder case) घटनेने वसमत शहरात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे प्रक्रिया सुरू होती कोणाचा कुणाला नंतर पोलिसांच्या तपासात या खुनाचे रहस्य उलगडणार आहे. खुणामागचे नेमके कारण काय ते सुद्धा स्पष्ट होईल. घटनास्थळी वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, जमादार गजानन भोपे, यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
मार्च महिन्यात भाऊ अपघातात दगावला
मयत अभिजीत शहाणे याच्या भावाचे मार्च महिन्यातच जिंतूर जवळ कार अपघातात निधन झाले होते आठ महिन्याच्या कालावधीतच दोन्ही भावाचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Wasmat murder case) खून प्रकरणाचे नेमके कारण अद्याप उलगडले नाही. मयत हा अत्यंत शांत स्वभावाचा तरुण म्हणून परिचित होता, असे निकटवर्तीयांनी सांगितले. गुरुवारी दुपारनंतर दुकानावरून तो गेला त्यानंतर तो परतलाच नाही. सकाळी त्याच्या खून झाल्याची बातमी समोर आली आहे.